लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी स्कूलची सीबीएसई परीक्षेत गरुडझेप; १००% निकालाची परंपरा कायम!
स्वरीत खटोड ९९.८०% गुणांसह सर्वप्रथम; ३१ विद्यार्थ्यांचे ९५ टक्क्यांहून अधिक गुण
लातूर: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) घोषित केलेल्या इयत्ता १० वीच्या (AISSE 2026) निकालात लातूर येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलने आपल्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा निकाल सलग १४ व्या वर्षी १०० टक्के लागला असून, स्वरीत कमलेश खटोड याने ९९.८०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
स्वरीत खटोडचे ‘शतकी’ यश
विद्यालयाचा स्टार विद्यार्थी स्वरीत खटोड याने ५०० पैकी ४९९ गुण मिळवत अभूतपूर्व यश संपादन केले. त्याने इंग्रजी, संस्कृत, गणित आणि आयटी या चार विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवले, तर विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयात ९९ गुण प्राप्त केले.
यशाची आकडेवारी:
विद्यालयाच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणीत यश मिळवले आहे:
९५% पेक्षा जास्त गुण: ३१ विद्यार्थी
९०% पेक्षा जास्त गुण: ६९ विद्यार्थी
८०% पेक्षा जास्त गुण: ४६ विद्यार्थी
७०% ते ८०% दरम्यान: ३९ विद्यार्थी
गुणवंत विद्यार्थ्यांची मांदियाळी
प्रतीक्षा मठपती (९८.२०%), स्पंदन वडगावकर (९८.२०%) आणि अक्षज भांगडीया (९८.२०%) यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ आदित्य राठी (९८%), वंश नावंदर (९८%), अर्णव देशमुख (९७.८०%), गोवर्धन भेन्डेकर (९७.८०%), राघव भार्गव (९७%), शंतनू कोरे (९७%) आणि ग्यान पपरुनिया (९७%) या विद्यार्थ्यांनीही चमकदार कामगिरी केली.
विषयनिहाय ‘सेन्चुरी’
विद्यार्थ्यांनी विविध विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवून विषयावर आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे:
संस्कृत: २२ विद्यार्थी
माहिती तंत्रज्ञान (IT): २७ विद्यार्थी
इंग्रजी: ८ विद्यार्थी
गणित: १ विद्यार्थी
संस्थाचालकांकडून कौतुक
या यशाबद्दल श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. शैलेशकुमार लाहोटी, विश्वस्त अध्यक्ष श्री. लक्ष्मिरमण लाहोटी, सचिव श्री. आशिष बाजपाई, विद्यालयाचे चेअरमन श्री. आनंद लाहोटी, प्राचार्य कर्नल एस. श्रीनिवासुलू आणि सर्व पदाधिकारी व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या कठोर परिश्रमामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी स्कूलची सीबीएसई परीक्षेत गरुडझेप; १००% निकालाची परंपरा कायम!
लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी स्कूलची सीबीएसई परीक्षेत गरुडझेप; १००% निकालाची परंपरा कायम!
लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी स्कूलची सीबीएसई परीक्षेत गरुडझेप; १००% निकालाची परंपरा कायम!