हिंदुस्तानातील वाघाच्या काळजाची उपमा असलेल्या महाराष्ट्रात केवळ 12 वर्षात 257 टक्के वाघांच्या संख्येत वाढ.हिंदुस्तानातील वाघाच्या काळजाची उपमा असलेल्या महाराष्ट्रात केवळ 12 वर्षात 257 टक्के वाघांच्या संख्येत वाढ.

हिंदुस्तानातील वाघाच्या काळजाची उपमा असलेल्या महाराष्ट्रात केवळ 12 वर्षात 257 टक्के वाघांच्या संख्येत वाढ.

लातूर दि 29 जुलै अभय मिरजकर – महाराष्ट्रातील शाहिर म्हणतात की, वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजिते दात, जात ही आमुची… पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची ! जसा वाघाचा रुबाब आहे तसाच रुबाब मराठी माणसांचा पण आहे. देशातील वाघांची संख्या सुंपुष्टात येत असताना व्याघ्र प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न झाले आणि वाघाच काळीज असणारा महाराष्ट्र ही उपमा सार्थ ठरवत महाराष्ट्राने यात आपले भरीव योगदान दिले. देशात सर्वाधिक गतीने महाराष्ट्रातच वाघांची संख्या वाढली आहे. राज्यात सध्या 446 वाघांचा अधिवास आहे. मागील बारा वर्षात महाराष्ट्रामध्ये तब्बल 257 टक्के वाघांची संख्या वाढली आहे.

हिंदुस्तानात वाघांचा अधिवास खुप आधीपासून आहे. राजे, महाराजे, सरदार नंतरच्या काळात इंग्रज सरकारचे अधिकारी, या शिवाय शिकारी यांच्यामुळे वाघ लुप्त होतो की काय अशी स्थिती निर्माण होऊ लागली होती. त्यामुळे 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यावेळी देशात 1800 वाघांची संख्या नोंदली गेली होती. वाघांची संख्या वाढवण्यासाठी शासनाने देशात व्याघ्र प्रकल्प सुरू केले. आज रोजी देशात 53 व्याघ्र प्रकल्प कार्यरत आहेत.

हिंदुस्तानातील वाघाच्या काळजाची उपमा असलेल्या महाराष्ट्रात केवळ 12 वर्षात 257 टक्के वाघांच्या संख्येत वाढ.

महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प 741.22 चौरस किलोमीटर मध्ये आहे. त्यामध्ये गाभा क्षेत्र 439.84 चौरस किलोमीटर तर बफर क्षेत्र 301.38 चौरस किलोमीटर एवढे आहे. बोर व्याघ्र प्रकल्प 816.27 चौरस किलोमीटर क्षेत्रात आहे. त्यामध्ये 138.12 गाभा क्षेत्र असून 678.15 चौरस किलोमीटर क्षेत्र हे बफर क्षेत्र आहे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 1165.57चौरस किलोमीटर क्षेत्रात आहे. 600.12 हे गाभा क्षेत्र असून 565.45 हे बफर क्षेत्र आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प 1727.59 चौरस किलोमीटर क्षेत्रात आहे. 625.82 चौरस किलोमीटर क्षेत्र हे गाभा क्षेत्र असून 1101.7 चौरस किलोमीटर हे बफर क्षेत्र आहे, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प 1194.94 किलोमीटर क्षेत्रात आहे. 653.67 चौरस किलोमीटर हे गाभाक्षेत्र असून 1241.27 चौरस किलोमीटर हे बफर क्षेत्र आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प 2768.52 चौरस किलोमीटर क्षेत्रात कार्यरत आहेत. याचे गाभा क्षेत्र 1500 . 49 चौरस किलोमीटरचे असून बफरक्षेत्र 10268.03 चौरस किलोमीटर एवढे आहे. वाघांची संख्या वाढवण्यात या व्याघ्र प्रकल्पांचा खूप मोठा सहभाग आहे.

देशामध्ये दर चार वर्षांनी वाघांची गणना करण्यात येत असते. महाराष्ट्राचा विचार केला तर 2006 मध्ये राज्यात केवळ 103 वाघ नोंदले गेले होते. त्यानंतर 2010 मध्ये झालेल्या गणनेत ही संख्या 168 वर पोहोचली‌ तर 2014 मध्ये झालेल्या गणनेत वाघांची संख्या 190 वर पोहोचली होती. 2018 मध्ये झालेल्या गणनेत वाघांची संख्या 312 एवढी झाली होती. 2022 मध्ये झालेल्या गणनेत ही संख्या 444 एवढी नोंदली गेली. मागील बारा वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रात वाघांची संख्या तब्बल 257 टक्केने वाढल्याचे दिसून येते.

हिंदुस्तानातील वाघाच्या काळजाची उपमा असलेल्या महाराष्ट्रात केवळ 12 वर्षात 257 टक्के वाघांच्या संख्येत वाढ.

राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांची संख्या

ताडोबा-अंधारी: या प्रकल्पात 97 वाघ आहेत,

पेंच: या प्रकल्पात 73 वाघ आहेत. मेळघाट: या प्रकल्पात 32 वाघ आहेत.

सह्याद्री: या प्रकल्पात 17 वाघ आहेत. नवेगाव – नागझिरा या प्रकल्पात 17 वाघ आहेत. बोर: या प्रकल्पात 8 वाघ आहेत.

सन 2022 च्या गणनेत देशात वाघांची संख्या ही 3682 एवढी असल्याचे निदर्शनास आले आहे. देशात सन 2006 मध्ये 1411 वाघ होते, 2010 च्या गणनेत 1706 वाघ नोंदले गेले होते. 2014 मधील वाघाच्या गणनेत ही संख्या 2226 एवढी झाली होती. सन 2018 मध्ये ही संख्या 2996 एवढी झाली होती. जगाच्या तुलनेत फक्त आपल्या भारतातच तब्बल 75 टक्के वाघ आढळून आले आहेत. मध्यप्रदेश मध्ये 785 वाघांची संख्या होती, कर्नाटकात 563 वाघ नोंदले गेले होते. उत्तराखंड मध्ये 560 वाघांची संख्या होती, महाराष्ट्रात वाघांची संख्या 444 एवढी नोंदली गेली होती. तामिळनाडू मध्ये 306 एवढे वाघ आढळून आले होते.

सर्वाधिक धोकादायक प्राणी म्हणजे माणूस असे म्हटले जाते. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात मोठ्या संख्येने वाघाची संख्या होती. परंतु शिकार म्हणून किंवा आता तस्करी म्हणून मोठ्या प्रमाणात वाघ मारले जात आहेत. केवळ वाघाची शिकार होते असे नाही तर सध्या विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांची शिकार ही केली जाते. वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कडक कार्यवाही सुद्धा होत असते. पण निर्बंध अथवा कारवाईने ते थांबणार नाही तर त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. ईश्वराने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे या न्यायाने वन्यजीवांनाही त्यांचे पुर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या जागेवर आपण अतिक्रमण केल्यामुळे संघर्ष निर्माण होतो आहे. परंतु आपण त्यांच्यासोबत जगायला शिकले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!