पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांची सुसाट कारवाई; आता अवैध धंद्येवाल्यांची खैर नाही.पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांची सुसाट कारवाई; आता अवैध धंद्येवाल्यांची खैर नाही.

पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांची सुसाट कारवाई; आता अवैध धंद्येवाल्यांची खैर नाही.

दोन दिवसात जुगार अड्यावर छापा मारत 15 लाख 23 हजार 870 रुपयाचा मुद्देमाल जप्तीसह 43 जणांवर गुन्हे दाखल.

लातूर दि 09 ऑगस्ट संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक 07 व 08 ऑगस्ट 2023 रोजी अवैध धंद्यावर छापेमारी करत जुगार, दारूबंदी कायद्यान्वये 5 जणांविरोधात गुन्हे दाखल करुन 07 लाख 6 हजार 520 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला होता त्यानंतर दिनांक 08 ऑगस्ट 2023 रोजी रात्रीच उशिरापर्यंत लातूर जिल्ह्यातील देवणी व गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत छापेमारी करून आणखीन 38 जणांविरोधात जुगार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 8 लाख 17 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहरचे भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, पोलीस अंमलदार खुर्रम काझी, रवी गोंदकर, दीनानाथ देवकते, यशपाल कांबळे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, जमीर शेख, नकुल पाटील यांनी केली आहे.

या जुगारावर छापा मारला असता तेथे इसम आरोपी नामे – 1) विश्वंभर बसवंतराव जाधव, वय 51 वर्ष, राहणार कासारतुगाव, तालुका भालकी जिल्हा बिदर. 2 ) बंडाप्पा काशिनाथ गडमाले, वय 53 वर्ष, राहणार बसस्थानकाच्या पाठीमागे, देवणी . 3) विलास संग्राम गरि, वय 50 वर्ष, राहणार नेकनाळ, तालुका देवणी. 4) सोमनाथ राचप्पा भदरशेटे, वय 58 वर्ष, राहणार लुल्ले गल्ली, देवणी. 5) पांडुरंग विठ्ठलराव मुळे, वय 32 वर्ष, राहणार दवणगाव, तालुका उदगीर. 6) लहू राम सूर्यवंशी, वय 34 वर्ष, राहणार फुलेनगर, देवणी. 7 ) ज्ञानेश्वर गोपीनाथ विभुते, वय 27 वर्ष, राहणार शिवनी, तालुका भालकी जिल्हा बिदर. 8) संतोष शालिवाहन विभुते, वय 37 वर्ष, राहणार शिवनी तालुका भालकी, जिल्हा बिदर. 9) बालाजी विठ्ठलराव बिराजदार- पाटील, वय 54 वर्ष, राहणार कासारतूगाव तालुका भालकी. 10) शकील रहीम साहब कुरेशी, वय 43 वर्ष, राहणार कासारतुगाव तालुका भालकी जिल्हा बिदर. 11) सिकंदर गुणवंत जाधव, वय 42 वर्ष, राहणार खंडोबा गल्ली, देवणी. 12) परमेश्वर शंकर जगताप, वय 32 वर्ष राहणार शिवनी तालुका भालकी जिल्हा बिदर. 13) शिवराज व्यंकट पवार, वय 31 वर्ष, राहणार शिवनी तालुका भालकी. 14 ) लक्ष्मण नरसिंग चांदुरे, 42 वर्ष राहणार होणाळी तालुका देवणी. 15) बसवराज बंडाप्पा महाजन, वय 58 वर्ष, राहणार देवणी. 16) अमर बालाजी माने, वय 25 वर्ष, राहणार साळे गल्ली, लातूर. 17 ) नितीन राम सोनवणे, वय 37 वर्ष, राहणार बौद्ध नगर, लातूर. 18) सुदर्शन जगताप सगर वय 23 वर्ष, राहणार एलआयसी कॉलनी, लातूर . 19) आशिष गणेश हासगुडे, वय 28 वर्ष, राहणार रामवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद.20) अतिक खाजापाशा सय्य, वय 26 वर्ष, राहणार एलआयसी कॉलनी, लातूर. 21) शैलेश काकासाहेब जाधव, वय 27 वर्ष, राहणार आदर्श कॉलनी, लातूर. 22 ) बालाजी ज्ञानोबा कोकाटे, वय 50 वर्ष, राहणार बौद्ध नगर, लातूर. 23 ) प्रकाश सोनाजी गायकवाड, वय 32 वर्ष राहणार बौद्ध नगर, लातूर.24) मिलिंद सोनाजी गायकवाड, वय 40 वर्ष, राहणार बौद्ध नगर, लातूर. 25) अर्जुन बालाजी माने, वय 38 वर्ष, राहणार साळे गल्ली, लातूर.26) आकाश बालाजी साळुंखे, वय 25 वर्ष, राहणार सोमवंशी नगर, आर्वी लातूर.27) धनाजी सोपान बनाटे, वय 42 वर्ष राहणार भिंगोली तालुका शिरुर अनंतपाळ.28) राहुल मनमत बिराजदार, वय 27 वर्ष राहणार मोंढा रोड, उदगीर. 29) शशीकुमार जयपाल मेहत्रे, वय 29 वर्ष, राहणार आंबेडकर चौक भालकी जिल्हा बिदर. 30) विलास शंकराप्पा शिंदे, वय 29 वर्ष, राहणार आंबेडकर चौक, भालकी जिल्हा बिदर. 31) प्रदीप काकासाहेब साळुंखे, वय 25 वर्ष, राहणार न्यूभाग्यनगर, लातूर. 32 ) संतोष शेषराव जाधव, वय 30 वर्ष, राहणार बालाजी नगर, लातूर. 33 ) प्रसाद शिवाप्पा बावगे, वय 30 वर्ष, राहणार मंठाळे नगर, लातूर.34) सुजित लक्ष्मण दामवाले, वय 28 वर्ष, राहणार रोहिदास नगर, लातूर. 35 ) आशिष दत्तात्रय शेळके, वय 24 वर्ष, राहणार जैन गल्ली, अंबाजोगाई. जिल्हा बीड सध्या राहणार खोरी गल्ली, लातूर. 36) ओंकार राजकुमार झुंजारे, वय 22 वर्ष, राहणार बजाज शोरूम च्या पाठीमागे, लातूर. 37 ) गणेश अर्जुन शेंडगे, वय 25 वर्ष, राहणार एलआयसी कॉलनी, लातूर. 38) अक्षय गायकवाड, राहणार बौद्ध नगर, लातूर. असे नमूद ठिकाणी ग्रुप करुन स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना व अनुक्रमांक ( 38 ) अक्षय गायकवाड राहणार बौध्द नगर, लातूर हा गांधी चौक पोलीस ठाण्याचे हद्दीमधील 60 फूट रोडवर टाकलेल्या छाप्यामध्ये लोकांना जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याचे आढळून आले आहेत. दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये वर नमूद इसमाकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहने असा 08 लाख एकूण 17 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमूद आरोपींचे विरोधात पोलीस ठाणे देवणी येथे कलम 45 जुगार अधिनियमा नुसार व पोलीस ठाणे गांधी चौक येथे 12 (अ) मुंबई जुगार अधिनियमानुसार दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, पोलीस अंमलदार खुर्रम काझी, रवी गोंदकर, दीनानाथ देवकते, यशपाल कांबळे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, जमीर शेख, नकुल पाटील यांनी केली आहे.

4 thoughts on “पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांची सुसाट कारवाई; आता अवैध धंद्येवाल्यांची खैर नाही.”
  1. लातूर जिल्हा व शहर मधिल ताज्या बातम्या त्याचबरोबर होत असलेल्या अनेक घडामोडी आपण आपल्या प्रसिध्द अश्या न्यूज पोर्टल वरून आम्हा लातूरकरांना कळवतात त्याबद्द्ल आपले मनापासून अभिनंदन करतो.👍🏻💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!