स्वातंत्र्य दिनानिमित्त सताळा येथे लोकनायक संघटनेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
लातूर दि 16 जिल्हातील सताळा येथील जिल्हा परिषद शाळेत काल स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकनायक सामाजिक संघटनेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शासन स्तरावर विद्यार्थ्यांना पुस्तके, शालेय पोषण आहार अश्या विविध सुविधा मिळतात पण वह्या पेन भेटत नाहीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यासाठी अडचणी येतात म्हणून लोकनायक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष श्री महादुभाऊ रसाळ यांच्या सकारात्मक भुमिकेतुन हा उपक्रम मौजे सताळा येथे राबवण्यात आला असल्याचे संघटनेचे सचिव बंटी गायकवाड यांनी सांगितले आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष महादुभाऊ रसाळ, सचिव बंटी गायकवाड, ॲड बालाजी कुटवाडे, दिपक सुर्यवंशी, वाघमारे किरण, सतिष मेथे, युनुस शेख, आनंद स्वामी, अमोल मेथे, साजित शेख, इस्माइल शेख, शिंदे गणेश, रमा टोंपे, रंजीत भालेराव, किरण वाघमारे, महादु वाघमारे व ग्रामस्थ उपस्थित होते.
