हासोरीत भूकंपाचा धक्काने घरे कमकुवत; तात्पुरता निवारासाठी 14 कोटीची गरज
प्रशासनाने मंजुर केले प्रत्येकी फक्त 45 हजार; शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची भेट.
लातूर दि १९ जुन निलंगा तालुक्यातील हासोरी येथे गुढ आवाजासह भुकंपाचे धक्के बसले होते. यामुळे येथील जुन्या काळातील बांधकामाच्या नव्वद टक्के घरांना याचा फटका बसला असुन ते घरे कमकुवत झाली आहेत. हि प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आंदोलने केली होती. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत तात्पुरता निवारसाठी आश्वासन दिले होते. तात्पुरता निवारासाठी हासोरी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावाचा अंदाजे खर्च १४ कोटी अपेक्षित असताना प्रशासनाने यापोटी प्रत्येकी फक्त ४५ हजार रु मंजुर केल्यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सदर बाबिची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने यांनी विरोधी पक्ष नेते श्री अंबादास दानवे यांची १८ जुन रोजी भेट घेत सदरील प्रकार सांगितला या गांभीर्यपूर्वक विचार करत श्री दानवे यांनी तात्पुरता निवारासाठी अपेक्षित रक्कम शासनाकडून उपलब्ध करुन घेऊ आणि या प्रकाराचा प्रशासनाला जाब विचारु असे आश्वासन दिले आहे.