महाराष्ट्राच्या शिवम शेट्टी ला सुवर्णपदक तर नम्रता तायडेला रौप्यपदक .महाराष्ट्राच्या शिवम शेट्टी ला सुवर्णपदक तर नम्रता तायडेला रौप्यपदक .

“एशियन गेम्स” इंडिया कॅम्प साठी निवड !!

बीड प्रतिनिधी : गुजरात येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेसाठी निवड चाचणी मध्ये भारतीय संघामध्ये महाराष्ट्राचे स्टार खेळाडू शिवम शेट्टी व नम्रता तायडे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान पटकावले असून या दोघांचीही “इंडिया कॅम्प” साठी निवड झाली आहे, अशी माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे यांनी दिली.

१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा, हँगजाऊ, चायना येथे होणार आहेत. त्यासाठी तायक्वांदो या खेळाची निवड चाचणी स्पर्धा १६ ते १८ जून २०२३ या कालावधीत गुजरात क्रीडा प्राधिकरण, नडियाद येथे सुरु आहे. या निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्रातील २ खेळाडूंची निवड “इंडिया कॅम्प” साठी करण्यात आली आहे. त्या मध्ये महाराष्ट्राचे खेळाडू कु नम्रता तायडे ६७ किलो वरील आणि शिवम शेट्टी ६३ किलो खालील वजन गटा मध्ये निवड झाली आहे. अंतिम निवड ५० दिवसाच्या इंडिया कॅम्प नंतर होईल. हा कॅम्प १ जुलै पासून स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, लखनऊ येथील कॅम्प मध्ये होणार आहेत. त्या नंतर या भारतीय टिम ला “फॉरेन एक्सपोजर” साठी ३० दिवस विदेशात विशेष प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे.

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम या दोन खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांनी केले आहे. या कामगिरीसाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक प्रवीण बोरसे सर व राष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण सोनकुल सर या दोन्ही प्रशिक्षकांचेही विशेष अभिनंदन होत आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, शिव छत्रपती पुरस्कार विजेते महासचिव मिलिंद पठारे , उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, सहसचिव सुभाष पाटील , कोषाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, निरज बोरसे, अजित घाडगे, सतीश खेमसकर व सर्व जिल्हा संघटनांचे पदाधिकारी यांच्याकडून दोन्हीं खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!