NEET पेपर फुटीची लातूरात तक्रार; शिकवणी वर्गावर संशयाची सुई, चौकशीचे आदेशNEET पेपर फुटीची लातूरात तक्रार; शिकवणी वर्गावर संशयाची सुई, चौकशीचे आदेश

लातूर: देशभरात गाजत असलेल्या NEET (UG)-2026 पेपर फुटीच्या प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचले आहेत. लातूरमधील एका खासगी कोचिंग क्लासेसने परीक्षेपूर्वी घेतलेल्या सराव परीक्षेतून (Mock Test) चक्क ४२ प्रश्न मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आल्याची धक्कादायक तक्रार एका पालकाने पोलीस अधीक्षक कार्यालयात दिली आहे. या अर्जाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने तातडीने चौकशीचे चक्र फिरवले आहे.

​आज दिनांक १२ मे २०२६ रोजी एका विद्यार्थिनीच्या पालकाने प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीनुसार:

  • ​लातूरमधील एका नामांकित क्लासेसने विद्यार्थ्यांची एक ‘मॉक टेस्ट’ घेतली होती.
  • ​या सराव पेपरमधील ४२ प्रश्न NEET (UG)-2026 च्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे विचारण्यात आले होते.
  • ​शासनाने आधीच पेपर फुटीमुळे ही परीक्षा रद्द केली असल्याने, या प्रकरणाचे धागेदोरे लातूरच्या या क्लासेसशी जुळलेले असण्याची दाट शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षकांचे कडक पाऊल

​तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्याकडे या अर्जाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

NEET पेपर फुटीची लातूरात तक्रार; शिकवणी वर्गावर संशयाची सुई, चौकशीचे आदेश

​”NEET पेपर फुटीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारीची सखोल चौकशी सुरू आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास संबंधितांना सोडले जाणार नाही.”

पोलीस प्रशासन, लातूर.

नागरिकांना आवाहन

​या प्रकरणाच्या संदर्भात जर कोणाकडे काही महत्त्वाची माहिती, पुरावे किंवा संशयास्पद बाबी आढळल्यास त्यांनी तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे (९१४५११९०४९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

​या तक्रारीमुळे लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस तपासात काय निष्पन्न होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!