लातूर पोलिसांचा थरार! हाय-प्रोफाईल कुंटणखान्यावर मध्यरात्री छापा; दोन महिलांची सुटकालातूर पोलिसांचा थरार! हाय-प्रोफाईल कुंटणखान्यावर मध्यरात्री छापा; दोन महिलांची सुटका

एलटीएन न्यूज | लातूर-नांदेड रोडवरील सारोळा ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या एका ‘हाय-प्रोफाईल’ वेश्या व्यवसायाचा स्वामी विवेकानंद पोलीस आणि मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाने (AHTU) पर्दाफाश केला आहे. रविवारी (११ मे) सायंकाळी उशिरा करण्यात आलेल्या या धडक कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या मुख्य आरोपी महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

​मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, महाराणा प्रताप नगर नजीकच्या एका दाळमिल जवळील शिवारात महिलांची तस्करी करून त्यांच्याकडून देहविक्री करून घेतली जात होती. या माहितीची शहानिशा करताच, स्वामी विवेकानंद पोलिसांनी आणि AHTU पथकाने संयुक्तपणे छापा टाकला.

​दोन महिलांची सुटका: आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून अनधिकृत कृत्य करून घेतले जात होते. कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, तिच्यावर मानवी तस्करी आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून PITA कलम ३, ४, ५ आणि भारतीय न्याय संहिता कलम १४३ अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

लातूर पोलिसांचा थरार! हाय-प्रोफाईल कुंटणखान्यावर मध्यरात्री छापा; दोन महिलांची सुटका

​ही मोठी कारवाई स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. यामध्ये: ​सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, ​पोलीस हेड कॉन्स्टेबल सदानंद योगी, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदामती यादव, ​धैर्यशील मुळे आणि जनार्दन फड यांच्या पथकाने अत्यंत गोपनीयतेने हा सापळा रचून कारवाई यशस्वी केली.

शेड स्थित असलेल्या जागा मालकाची चौकशी होणार?


​ज्या परिसरात हा व्यवसाय सुरू होता त्या भव्य शेट मधे वेगवेगळे अनेक अलिशान वातानुकूलित कंम्पार्टमेंट, बेड व वेगवेगळ्या मार्गाने दरवाजे बनवण्यात आले आहेत त्यामुळे तिथला मूळ मालक या काळ्या धंद्यात सहभागी आहे का? हा वेश्या व्यवसाय किती काळापासून सुरू होता? आणि यामागे मोठे रॅकेट आहे का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. परिसरातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, आता जागेच्या मालकावर पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!