भक्तांसाठी खुशखबर! पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक विशेष ट्रेन आता नियमित धावणारभक्तांसाठी खुशखबर! पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक विशेष ट्रेन आता नियमित धावणार

लातूर (प्रतिनिधी): विठ्ठल भक्तांसाठी आणि तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक विशेष ट्रेन आता कायमस्वरूपी ‘नियमित’ गाडी म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन बदल आणि वेळ:

  • गाडी क्र. १७४३७ तिरुपती-पंढरपूर: ही गाडी १६ मे २०२६ पासून दर शनिवारी तिरुपतीवरून दुपारी ४.०० वाजता सुटेल आणि रविवारी संध्याकाळी ७.०० वाजता पंढरपूरला पोहोचेल.
  • गाडी क्र. १७४३८ पंढरपूर-तिरुपती: ही गाडी १७ मे २०२६ पासून दर रविवारी पंढरपूरवरून रात्री ८.०० वाजता सुटेल आणि सोमवारी रात्री ११.३० वाजता तिरुपतीला पोहोचेल.

प्रमुख थांबे: ही गाडी लातूर, लातूर रोड, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, उदगीर, बीदर आणि सिकंदराबादमार्गे तिरुपतीला जाईल. या निर्णयामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गाडीची रचना: एकूण २४ डब्यांच्या या गाडीत एसी-२ टियर (१), एसी-३ टियर (३), स्लीपर क्लास (१४) आणि जनरल बोगी (४) यांचा समावेश आहे.

आरक्षण: या गाडीचे आरक्षण सर्व संगणकीकृत केंद्रांवर आणि IRCTC च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!