महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करा; लातूर मनपावर 'ठिय्या आंदोलन'!महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करा; लातूर मनपावर 'ठिय्या आंदोलन'!

अतिक्रमण कारवाई दरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप; ‘शहीद अहमद खान पठाण कृती समिती’ आक्रमक

लातूर (प्रतिनिधी):

लातूर महानगरपालिकेच्या B-Zone अंतर्गत सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईदरम्यान एका महिला झोनल अधिकाऱ्यांशी वाद घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या विरोधात आज वातावरण चांगलेच तापले. या प्रकरणी दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, या मुख्य मागणीसाठी ‘शहीद अहमद खान पठाण कृती समिती, लातूर’ च्या वतीने लातूर महानगरपालिका कार्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले.

काय आहे नेमकं प्रकरण?

९ ऑक्टोबर २०२६ रोजी लातूर मनपाच्या प्रभाग क्रमांक १६ मधील गटारींवरील अतिक्रणाची पाहणी व कारवाई करण्यासाठी B-Zone च्या झोनल अधिकारी आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी-कर्मचारी गेले होते.

या कारवाईदरम्यान नगरसेविका राजश्री थोतरे यांचे पती अंकित बाहेती यांनी महिला झोनल अधिकाऱ्यांशी वाद घालून शासकीय कामात थेट हस्तक्षेप केल्याचा आणि अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप कृती समितीने केला आहे. तसेच, या घटनेदरम्यान जातीय संदर्भाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत निष्पक्ष चौकशी करून खरी सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:

  • तात्काळ निष्पक्ष चौकशी: संपूर्ण घटनेची प्रशासनाने तातडीने निष्पक्ष चौकशी करावी.
  • व्हिडिओ/सीसीटीव्ही तपासणी: घटनेचे सीसीटीव्ही/व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांचे जबाब तपासावेत.
  • गुन्हा दाखल करा: शासकीय कामात अडथळा निष्पन्न झाल्यास संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा.
  • ॲट्रॉसिटी/जातीय वक्तव्यावर कारवाई: जातीय स्वरूपाचे वक्तव्य किंवा वर्तन सिद्ध झाल्यास स्वतंत्र कायद्यानुसार कारवाई व्हावी.
  • राजकीय दबाव टाळा: मनपा कर्मचाऱ्यांवर कोणताही राजकीय किंवा वैयक्तिक दबाव येऊ नये, याची दक्षता घ्यावी.
  • अतिक्रमणमुक्त गटारी: गटारींवरील अतिक्रमण कारवाई कोणत्याही राजकीय दबावाशिवाय पार पाडावी.
  • कठोर कारवाईचा पायंडा: शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर भविष्यात कठोर कारवाईचा पायंडा पाडावा.

प्रशासनाला इशारा :

“प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता, कामात अडथळा आणणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत.”

— सय्यद सरफराज (शहीद अहमद खान पठाण कृती समिती, लातूर)

— सय्यद सरफराज (शहीद अहमद खान पठाण कृती समिती, लातूर)

आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा!

लातूर मनपा प्रशासनाने या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई न केल्यास, येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र आणि आक्रमक केले जाईल, असा स्पष्ट इशाराही कृती समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.

आंदोलनाला प्रमुख उपस्थिती:

महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करा; लातूर मनपावर ‘ठिय्या आंदोलन’! अतिक्रमण कारवाई दरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप; ‘शहीद अहमद खान पठाण कृती समिती’ आक्रमक

या ठिय्या आंदोलनात नगरसेवक अफजल भाई कुरेशी, ॲड. फारुक शेख, नगरसेवक अहेमद खान, मनसे शहर अध्यक्ष मनोज अभंगे, नगरसेवक वाहेद शेख, स्वाभिमानी मुस्लिम संघटनेचे मोहसीन खान, मुस्लिम यंग योद्धाचे संस्थापक अध्यक्ष वाजीद भाई मणियार, दख्खन टायगर संघटनेचे अध्यक्ष सलीम भाई, जन एकता संघटनेचे अध्यक्ष इरफान भाई, एसडीपीआयचे निसार भाई तांबोळी, ॲड. मुस्ताक सौदागर, गाझी ग्रुप अध्यक्ष बिलाल शेख, इम्रान खान, जुनेद अत्तार, ॲड. लालासाहेब शेख, समितीचे सद्दाम भाई सय्यद, आसिफ गोलंदाज, इस्माईल शेख, हक्कानी शेख, इस्माईल हाश्मी, शादुल शेख, जावेद शेख, मोहसीन शेख, मुबिन शेख, हातिम भाई शेख, ॲड. अदनान सय्यद, ॲड. अली शेख, अक्षय धावारे आणि मुस्लिम समाजाचे असंख्य बांधव उपस्थित होते.

📌 अधिक ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी फॉलो करा: लातूर नेता डिजिटल वेब न्यूज

You cannot copy content of this page

error: Content is protected !!