Hanmantwadi police patil sapateHanmantwadi police patil sapate

हणमंतवाडी च्या पोलीस पाटील सपाटेंचा विशेष उल्लेखनिय राज्यपाल सेवा पुरस्कार प्रदान.

लातूर दि 02 मे मा.पोलीस अधिक्षक श्री. सोमय मुंडे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अजय देवरे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जितेंद्र जगदाळे मा. पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच पोस्टे विवेकानंद चौक, लातूर येथील अधिकारी व कर्चचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

श्री. भाऊसाहेब किशनराव सपाटे वय ५८ वर्षे रा. हणमंतवाडी ता.जि. लातूर येथील रहिवासी आहे. मी सन १९९९ पासून आजतागायत पोलीस पाटील या पदावर सध्या विवेकानंद चौक, लातूर पोलीस स्टेशन हददीत कार्यरत आहे. तसेच त्यांनी पोलीस स्टेशन विवेकानंद चौक, लातूर येथील दाखल गुन्हयात तपासकामी वेळोवेळी मदत केली आहे. तसेच गावातील उत्सव, सण, धार्मिक, सामाजिक कार्य केले आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यास त्यांच्याकडून मदत झाली आहे. त्या कार्याचा यथोचित गौरव आपले पोलीस स्टेशनकडून करण्यात आला आहे. गावात घडणा-या लहान सहान गोष्टीची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला व बीट अंमलदाराला कळवून सदर ठिकाणी स्वतः हजर राहून प्रकरण हाताळण्यामध्ये पोलीस प्रशासनास योग्य ती मदत करीत केलेली आहे. तसेच गावातील शेतीचे वाद, किरकोळ व कौटुंबिक वाद, गावपातळीवर सामोपचाराने मिटविले असून साथीचा रोग कोरोना या कालावधीमध्ये प्रशासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन गावामध्ये सर्व नागरिकांना करण्यास भाग पाडले होते तसेच प्रशासनास मोलाचे सहकार्य केले होते. तसेच पोस्टे विवेकानंद चौक, लातूर गुरनं -५६४/२०२१ कलम ४५७,३८० भादंविमधील अज्ञात आरोपीचा शोध घेवून आरोपी निष्पन्न करण्याबाबत पोलीस पाटील यांनी योग्य ती मदत केली आहे. त्यामुळे नमुद गुन्हयातील आरोपीकडून माल एकूण २१,०००/- रु चा हस्तगत करण्यात मोलाचे सहकार्य केल्यामुळे सदरील गुन्हा उघडकीस आले आहेत.

तसेच ग्रुप ग्रामपंचायत कासारगाव / हणमंतवाडी येथील कासारगाव येथे स्मशान भूमी उपलब्ध नसल्याने सदर गावातील मयत झालेल्या व्यक्तीस मौजे हणमंतवाडी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्याचे मा. जिल्हाधिकारी साहेब, लातूर यांचे आदेश होते परंतु सदर आदेशाने दोन्ही गावामध्ये स्मशानभूमीवरून वाद निर्माण झाला होता. सदर स्मशान भूमीचा वाद पोलीस पाटलाच्याच्या मध्यस्थीने व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने शांततेत पार पडले. सदरील प्रकरणामध्ये पोलीस पाटलाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याने सदर प्रकरणामध्ये कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. करिता पोलीस पाटील भाऊसाहेब किशनराव सपाटे मौजे हणमंतवाडी ता.जि.लातूर यांच्या वरील केलेल्या विशेष कार्याचा दखल घेवून “पोलीस पाटील विशेष उल्लेखनिय सेवा पुरस्कार सन- २०२२-२३” चा पुरस्कार राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब, लातूर यांच्या हस्ते दि.०१/०५/२०२३ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मा. सोमय मुंडे पोलीस अधिक्षक, लातूर व इतर मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत पार पाडला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!