स्वामी विवेकानंद पोलीस स्टेशनची डाॅ बाबासाहेब जयंतीच्या 19 मंडळासोबत शांतता बैठक संपन्न.
लातूर दि 12 एप्रिल शहरातील अती संवेदनशील असलेल्या आणि लोकसंख्या व क्षेञफळाच्या इतर पोलीस स्टेशन तुलनेत मोठे असलेले स्वामी विवेकानंद पोलीस स्टेशन हद्दीतील साधारण 19 मंडळाची पोलीस प्रशासनाने डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्ताहात व शांततेत साजरी करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर व पोलीस उपनिरीक्षक श्री महेश गळगटे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत अभिवादन रॅली नियोजित वेळेत सुरु करुन वेळेत समाप्त करावी, साहसी खेळ प्रकार दाखवताना पुरेशी काळजी घ्यावी, वृद्ध व बालकांनकडे विशेष काळजीपूर्वक लक्ष द्यावे, नशापाण न करता रॅलीत सहभागी व्हावे, डाॅल्बी लावू नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, जर तसे घडत असेल तर तर तात्काळ नियोजनातील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना कळवावे किंवा 112 वर काॅल करावे. अश्या आवश्यक त्या सुचना देवून त्याचे पालन करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांनी केले आहे. या बैठकीचे आयोजन पोलीस स्टेशन च्या गोपनीय शाखेचे प्रमुख श्री पद्माकर सुरवसे यांनी केले होते तर यावेळी साधारण 19 मंडळांचे अध्यक्ष सचिवासह पदाधिकारी उपस्थित होते.
