गोपी साठे यांना संत शिरोमणी सावता माळी सेवाभावी संस्थेचा “महात्मा फुले समाजरत्न” पुरस्कार प्रदान
लातूर दि 10 एप्रिल महात्मा फुले ब्रिगेड तथा संत शिरोमणी सावता माळी सेवाभावी संस्था लातूर यांच्या वतिने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या 20 समाजसेवकांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. काल दि 09 एप्रिल रोजी विश्व पॅलेस मंगल कार्यालय अंबाजोगाई नांदेड रिंगरोड लातूर येथे संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी लातूर महानगरपालिका वरिष्ठ लिपिक श्री गोपी साठे यांचे नाव घोषित केले होते. साठे यांना श्री. संत सावता महाराज यांचे वंशज ह.भ.प. श्री. रविकांतजी वसेकर महाराज व क्रांतीज्योती सावित्री फुले यांचे वंशज श्री. दिलीपजी नेवसे पाटील यांच्या हस्ते हा महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गोपी साठे हे नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असतात ते दिवाळी सारख्या सणात एकही अनाथ उपाशी राहु नये म्हणून लोकसहभागातून मदत करतात हिवाळ्यात रस्ताच्या कडे थंडीत कुडकुडणार्या बेघर अनाथांना थंडीपासून बचाव करणारे कपडे पुरवतात अशी त्यांची लातूर शहरात ओळख आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात 22 जिल्ह्यातील समाजसेवकांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला शिक्षक आमदार विक्रम काळे, अभिजीत देशमुख, कुलदीपजी सुर्यवंशी, बसवराज धाराशिवे, राजाभाऊ चौगुले,प्रा अंकुशजी नाडे, नृसिंहजी घोणे, दत्ताजी चांबरगे माळी यांची प्रमूख उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना दत्ता चांबरगे माळी यांनी केले तर संत शिरोमणी सावता माळी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, पुरस्कर्ते व नागरिक मोठ्या संख्येवर उपस्थित होते.