क्रीडा मंञी श्री बनसोडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी प्रांगणात वृक्ष लागवड.
लातूर दि 16 ऑगस्ट सत्तासहत्तरावा स्वातंत्र्य दिनानिमित्त झाडे लावा झाडे जगवा संकल्पना घेऊन साजरा करण्यात आला या समारंभात ध्वजारोहण करुन विविध शासकीय योजना आणि त्याचा लाभ लाभार्थींना प्रदान करत राज्य क्रीडा व युवक मंञी नामदार श्री संजय बनसोडे यांचे भाषण झाले. या कार्यक्रमाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात श्री संजय बनसोडे यांच्या हस्ते वृक्ष लावून करण्यात आले तर जिल्ह्यात वनक्षेञ खुप कमी असुन जिल्हातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या स्वातंत्र्यदिनी किमान एक वृक्ष लावून त्यासमवेत सेल्फी काढावे त्याचे संगोपन करुन पुढील वर्षी त्या वृक्षाचा वाढदिवस साजरा करावा. अश्या खोचक सूचनाही जिल्हाधिकारी सौ वर्षा घुगे ठाकुर यांनी दिल्या आहेत.
यावेळी इतर मान्यवरांच्याही हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली तेंव्हा प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी नमन, आरडीसी श्री ढगे, उपजिल्हाधिकारी श्री महाडिक, पोलीस अधीक्षक, सोमय मुंडे, वन अधिकारी श्री सचिन रामपुरे, श्री एन एस बिराजदार, श्री महेश पवार श्री बालाजी पाटील, श्री घोगरे वनरक्षक यांच्यासह मोठ्या संख्येवर आजी माजी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
