खासदार श्री सुधाकर श्रृंगारे याच्या हस्ते कृपासदन शाळेत झेंडावंदन.
लातूर दि 17 ऑगस्ट शहरातील इंग्रजी माध्यमातील नामांकिआत कृपासदन काॅन्वेन्ट इंग्लिश स्कुल मधे मा ना श्री सुधाकर श्रृंगारे खासदार लातूर लोकसभा मतदार संघ यांच्या हस्ते सत्ताहत्तरावा स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यात आहे. विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भारतासाठी खुप शिकावे चांगल्या हुद्यावर नौकरी करावी, व्यवसाय आणि अत्याधुनिक शेतीचा विकास साधावा असे आपला शुभेच्छापर भाषणात खासदार श्री श्रृंगारे यांनी म्हटले आहे. यावेळी कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री घारगे, श्री बालाजी जाधव उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापिका सिस्टर ममता व सि बी एस सी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर प्रतिभा यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिस्टर ममता यांनी केले तर सिस्टर रानी, फादर अलफ्रेड, फादर सुरेश यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री युसुफ व श्री कोंबडे यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व संपूर्ण शाळेचे व्यवस्थापन मंडळ उपस्थित होते.







