नागरिकांना समजेना जल जिवन कि गुत्तेदार जिवन; खासदाराने मागवली जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती.
लातूर दि 21 लातूर जिल्ह्यातील जल जिवन योजना सपशेल फोल ठरत असुन सरकारने नागरिकांना स्वच्छ जल पेय उपलब्ध व्हावे या उद्देशातून हि योडना सुरु केली पण लातूर च्या संबंधित अधिकारी आणि गुत्तेदार हा निकृष्ट दर्जा वापरत असल्यामुळे जिल्हा प्रशासनासह सर्वजणच मिलीभगत आहेत कि काय अशी भावना जनमानसात निर्माण झाली आहे. या जल जिवन योजनेच्या कामामुळे मानव जिवन विस्कळीत होत असुन अनेक ठिकाणी खोदलेले खड्डे बराच काळ तसेच राहत आहेत. या खड्यात अपघाताचे प्रमाणही वाढत अहे. अश्या तक्रारी लोकप्रतिनिधी लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री सुधाकर श्रृंगारे यांच्याकडे प्राप्त होत आहेत अश्या आशयाचे पञ खासदार श्रृंगारे यांनी जिल्हा प्रशासनास जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे. या पञात खासदारांनी तात्काळ या कामाच्या चौकशीसाठी शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमुन चौकशी करावी व त्या चौकशीचे जिपिस लोकेशन फोटोसह खासदार कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यासंदर्भात पञात म्हटले आहे पण अद्याप त्यावर कोणतेही कार्यवाही झाली नसल्याचे खासदार यांच्या कार्यालयातून समजते..