गरुड चौक ते करीम नगर रस्त्याची दुरावस्था केली आमदार देशमुखांनी दुर; मनपा होती सुस्त.
लातूर दि 22 ऑगस्ट प्रभाग क्रमांक 3 मधील करीमनगर येथेल गेले 15 ते 20 वर्षापासून चे रस्त्याचे रखडलेले काम आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांने सर्व नागरिक व नगरसेवकांच्या मागणीवरून आज आदेश दिल्याने करीमनगर भागातील नागरिक व प्रभाग क्रमांक 3 चे प्रभाग अध्यक्ष सर्व मजी नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली. गेले दहा-पंधरा वर्षांपासून गरुड चौक रिंग रोड ते करीमनगर मीम चौक पर्यंत भागातील नागरिकांची रोड बनवण्यासाठी ची मागणी होती वेळोवेळी महानगरपालिकेला निवेदन करूनही काम होत नव्हतं त्यामुळे सर्व नागरिकांनी लातूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेबांची भेट घेतली यावेळी लागलीच कामाचे वर्कआउट करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश साहेबांनी दिले त्या ठिकाणी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली गेले दहा-पंधरा वर्षांपासून चा विषय मार्गी लागल्यामुळे नागरिक आनंद व्यक्त करत आहेत यावेळी कामाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक 3 चे काँग्रेस पक्षाचे प्रभाग अध्यक्ष विकास कांबळे, माजी नगरसेवक विजय साबदे, वर्षा मस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष जाधव, सुभान रकटे, सादिक शेख, शाहरुख पठाण, इब्राहिम बाबा, शेख जुनेद, दगडू पठाण, असलम चाऊस, अमजद पठाण, बाबा पठाण, वकीलसाब व प्रभागातील सर्व नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.