उमरग्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मिरवणूक
उमरगा प्रतिनिधी दि 22 ऑगस्ट धाराशिव जिल्हातील उमरगा येथे साहित्य रत्न डॉ. आण्णा भाऊ साठे यांच्या 103 वी जयंती कमिटी उमरगा शहराच्या वतीने रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी प्रमुख उपस्थिती लहुजी शक्ती सेनेचे जेष्ठ नेते मा.दिलीप भाऊ गायकवाड, जिल्हा अध्यक्ष मा. शिवाजी गायकवाड, नुतन पद नियुक्ती झालेले जिल्हा उपाध्यक्ष मा. सुधाकर बनसोडे, तालुका अध्यक्ष मा. विजय तोरडकर, युवक तालुका अध्यक्ष नितीन शिंदे, कोर कमिटी तालुका अध्यक्ष तानाजी शिंदे, जेष्ठ नेते मा. राजाभाऊ शिंदे, दत्ता कांबळे, राम कांबळे, इंद्रजित सुर्यवंशी, अशोक पात्रे व हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले समाज बांधव व लहु सैनिकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. जयंती कमिटी अध्यक्ष विजय तोरडकर, उपाध्यक्ष तानाजी शिंदे, आधार स्तंभ राजाभाऊ शिंदे, सचिव दत्ता कांबळे, सहसचिव राम कांबळे, कार्याध्यक्ष इंद्रजित सुर्यवंशी, व्यवस्थापक अशोक पात्रे, बाळु लोखंडे इत्यादींनी परिश्रम घेतले. त्याच बरोबर लहुजी शक्ती सेना उमरगा शहर शाखेचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष मा. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
