इस्माईल शेख यांची राज्याच्या खाजगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मंडळ कार्याध्यक्ष पदी निवड.
लातूर दि 28 ऑगस्ट पद्मिनी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक इस्माईल शेख यांची महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मंडळाच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन हि निवड मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाचे अध्यक्ष तथा संत शिराेमणी माराेती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री गणपतराव बाजुळगे यांच्या अध्यक्षतेखाली हाॅटेल पार्थ, अंबाजाेगाई राेड, लातूर येथे करण्यात आली असल्याचे एका प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.
नुकत्याच झालेल्या या बैठकीस प्रमुख अतिथी म्हणुन मंडळाचे सचिव श्री सुरेश लखनगावे, श्री विनायक शिंदे, श्री हरिदास काेनाळीकर, श्री माेरे, श्री इप्पर, सौ शिंदे, सौ खंदारे यांची उपस्थिती हाेती तर याच बैठकित नुतन कार्यकारणीची निवड सर्व सभासदांच्या संहमताने करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे व शैक्षणिक प्रश्नांची जाण असणारे मुख्याध्यापक इस्माईल शेख यांची ओळख आहे ते कार्याध्यक्ष म्हणुन सक्रिय आणि प्रभावशाली कार्य करतील अशी सर्व सभासदांना अपेक्षा आहे. या निवडीमुळे इस्माईल शेख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
