पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर यांच्या नांदेड येथील बदलीनिमित्त निरोप समारंभ.
लातूर दि 30 जुलै स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यातील सक्रिय पोलीस अधीकारी पोलीस उपनिरीक्षक श्री बालाजी राम गोणारकर यांची नियत कालिकानुसार नांदेड येथे बदली झाली असुन त्यांचा आज पोलीस ठाण्यात सिंघम पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या हस्ते स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

श्री बालाजी गोणारकर हे 2018 च्या 115 व्या महाराष्ट्र राज्य स्पर्धा परिक्षेतून त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली होती तर त्यांनी रेल्वे पोलीस, नागपूर, नांदेड, देगलूर, धर्माबाद व आता ते स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नियतकालिकेनुसार त्यांची नांदेड येथे बदली झाली असुन ते कर्तृत्ववान पोलीस अधिकारी असल्याचे बोलले जाते. ते लातूर येथे सेवा देताना डि मार्ट जवळील दरोड्यातील मोका लागलेल्या आरोपींचा उत्कृष्ट तपास केला असल्याचे पोलीस निरीक्षक श्री बावकर यांनी सांगितले आहे.
यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री केदार पोलीस उपनिरीक्षक श्री महेश गळगटे, श्री अनिल कांबळे, श्री बालाजी गोणारकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.