महाराष्ट्र राज्याचे वित्त व नियोजन आणि वनमंञी ना श्री सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन…महाराष्ट्र राज्याचे वित्त व नियोजन आणि वनमंञी ना श्री सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन…

महाराष्ट्र सरकारचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंञी ना श्री सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन…

श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जीवनप्रवास प्रविण शिवणगिकर यांच्या लेखणीतून.

प्रण अंत्योदय..

जनतेप्रती अतुल्य उत्तरदायित्व भाव जपणारे, आपल्या कृतीतून प्रचंड लोक विश्वास संपादन करून कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, जनतेच्या मनावर राज्य करणारे महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व प्रभावी वित्त व नियोजन आणि वने मंत्री मा ना श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी यांना जन्मदिनानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा !

‘जर आमदारकीच्या या टर्म मध्ये बल्लारपूर तालुका निर्मिती नाही करू शकलो तर आयुष्यभर निवडणूक लढविणार नाही’ असे निवडणुकीपूर्वी जनतेला सांगून पुढील निवडणुकीपूर्वी विधिवत तालुका निर्माण करणारे सुधीर भाऊ हे दिलेला प्रत्येक शब्द पाळणारे नेतृत्व म्हणून सर्वत्र सुपरिचित आहेत. सत्तेच्या अमानुष राजकारणात दिलेला शब्द पाळला जाईलच याची आज कोणीही शाश्वती देत नाही. किंबहना त्याला असे विशेष महत्व राहिले नाही पण सुधीरभाऊ त्यास अपवाद आहेत. जनसामन्यांच्या संपर्कात राहणे, त्यांची कामे करणे, व्यथा सोडविणे गरज पडेल तेथे संघर्ष करणे पण सामान्यांना न्याय मिळवून देणे हा सुधीर भाऊंचा पिंडच आहे. आपल्या सर्वसमावेशक स्वभावाने प्रचंड जनमानस त्यांनी मिळविला आहे. चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे सतत चार वेळा राज्य विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारे सुधीरभाऊ १९९५ मध्ये प्रथमच विधानसभेवर निवडून आले. यानंतर लवकरच म्हणजे १९८१ मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस झाले आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली. नंतर जनतेने त्यांना कधी मागे वळून पाहूच दिले नाही. ते सर्वार्थाने लोकनेते जाहले यावेळी त्यांनी ५५ हजाराचे विक्रमी मताधिक्य मिळविले होते. लगोलग ते भाजपा-सेनेच्या युती सरकार मध्ये पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री देखील झाले.

प्रभावी निर्णयक्षमता हि भाऊंची जमेची बाजू आहे. आपल्या मतदारसंघातून देशाचा सैनिकी अधिकारी घडावा, विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणाचे धडे मिळावी हि त्यांची इच्छा होती, सन २०१५ मध्ये संकल्प सोडून अगदी अल्पवधीत केंद्र सरकार सोबत पाठपुरावा करून त्यांनी मंजूर करून घेतला व आज देशातील सर्वात अत्याधुनिक, अद्यावत सुविधांसह सैनिक स्कूल, चंद्रपूर विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. उच्चविद्याभूषित मा सुधीरजी यांनी एम.कॉम., एल.एल.बी., एम. फिल., डी.बी.एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत. उच्चशिक्षणास कल्पकता व सामाजिक जाणिवेची जोड असलेले सुधीरभाऊ यांचे अलोकिक कर्तुत्व अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांतून प्रकाशमान आहे. नुकतेच संपूर्ण देशात मंत्रालयीन कार्यालय आय एस ओ मानांकित करण्याचा मान देखील त्यांच्याच कार्यकाळात व कार्यालयास जातो. कार्यालयीन कामकाज पद्धती, पत्रव्यवहार, कर्मचारी प्रशिक्षण, कालबद्ध निकाल आदी अनेक मानदंडासह सुशासन प्रदान करणारे प्रभावी कार्यालय व नेतृत्व हे सुधीर भाऊंनी सिद्ध केले आहे.

गडचिरोली येथे अहिंसा पुरस्कृत संस्कृती निर्माण करण्यासाठी अत्यंत कल्पकतेने वाचन कार्यक्रम घेऊन त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेण्यास भाग पडावे एवढी परिपक्वता असणारे मंत्री म्हणून सुधीर भाऊ हे एक वेगळे रसायन आहे.

कोट्यावधी वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवून ते नियत मर्यादे आधीच पूर्ण करून, व्याघ्र गणना व सुरक्षा उपक्रम, बांबू पासून राख्या व अत्याधिक वापराच्या वस्तूंची निर्मिती, शिखर शिंगणापूर येथील १७६ हेक्टर परिसरात ‘बेल’ न आदी अनेक यशस्वी अंमलबजावणी च्या माध्यमातून व खाते व कार्य हे सुधीर भाऊ मुळेच अधोरेखित झाले आहे.

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र मार्कण्डेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व विधानसभा सदस्य यांच्याकडून स्थानिक विकास निधीतून निधी मिळण्यासाठी नियोजन विभागाकडू विशेष परिपत्रक काढून, त्यामाध्यमातून, निधी मागवून या परिसरात रस्ते, विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा योजना, शौचालय बांधकाम, धर्मशाळा बांधकाम आदी विकास कामांची पूर्तता, विशेष बाब म्हणून करण्यात आलेल्या राज्यातील हा पहिला यशस्वी प्रयत्न ठरला.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक चंद्रपूर या संस्थेच्या माध्यमातून अनेक अभिनव लोकोपार्यागी सामाजिक उपक्रमांचे आयोजन आजही अविरत पाने चालू आहे. कोणतेही राजकीय पद नसताना चंद्रपूर शहरात निशुल्क सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचा उपक्रम सुरु केला. चंद्रपूर शहरात वाचनालय संस्थेची अद्ययावत वास्तूत ग्रंथसमृद्ध वाचनालय, सामाजिक अर्थसहाय्याच्या व संजय गांधी निराधार योजना व गरीब गरजूंसाठीच्या जिवनदायी आरोग्य योजना या योजनांची माहिती लाभ्यार्थांना मिळावी, त्याचा सहज लाभ घेता यावा यासाठी माहिती व मार्गदर्शन केंद्र जनतेच्या सेवेत रुजू, गरीब व गरजू मुलींसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. अशाच पद्धतीने माहिती व मार्गदर्शन केंद्र बल्लारपूर शहरातही जनतेच्या सेवेत आहेत. आजतागायत अनेक नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन, त्या माध्यमातून रुग्णांना मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अपंग मार्गदर्शन मेळावे, बचतगट महिलांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पायाने अपंग असलेल्या व्यक्तींना मोठया प्रमाणावर तीन चाकी सायकलींचे वितरण भाऊंनी करून एक आगळीवेगळी दिव्यांगसेवा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सत्तेत असो विरोधी पक्षात मा सुधीरभाऊ यांनी आपल संघर्षशील बाणा जपत, अन्त्योदयासह सर्व घटकांचा चौफेर शाश्वत विकास केला. स्वतंत्र खनिज विकास मंत्रालय, स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ स्थापना, उपेक्षित मातंग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी क्रांतिवीर लहजी साळवे मातंग आयोग, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या रकमेत दुपटीने वाढ १० हजार रु. अर्थसहाय्य २० हजार रु. करण्याचा निर्णय असो की राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या परिरक्षण अनुदानामध्ये विद्यमान अनुदानाच्या ५० टक्के व करण्याचा निर्णय असो अशा पद्धतीने सतत जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे सुधीरभाऊ लोकप्रिय लोकनेते ठरतात.

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि सार्वजनिक जीवनाला आरंभ केला. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीस पदी निवडून माझा अत्यंत जवळून संबध आल्याने एक गोष्ट मी मूद करतो की, जेवढे संघर्षशील तेवढेच मानाने हळवे असलेल्या मा सुधीरभाऊ यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता हा त्यांचातील राजकीय कार्यकर्त्यापेक्षा अधिक प्रबळ आहे. सत्य बोलणे, विश्वासपूर्ण शब्द देणे आणि दिलेला शब्द पूर्ण करणे हे सद्गुण त्यांना जनतेच्या मनातील सिंहासनावरून कधीच खाली उतरू देणार नाहीत. असे वयाच्या १३ व्या वर्षापासूनच समाजजीवनात रममाण असणारे एक कार्यकर्ता ते पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व विद्यार्थी नेता ते मंत्री असा प्रवास करत प्रत्येक कार्यकर्त्या ला सन्मान देणारे, स्वच्छ व पारदर्शी व्यवहाराचे धनी, संवेदनशील व कर्तबगार नेते श्री सुधीर भाऊ समाजजीवनात कार्य करणाऱ्या तमाम स्वयंसेवकांना मार्गदर्शन देणारे दीपस्तंभ आहेत.

मा सुधीरभाऊ यांनी घेतलेले हे अंत्योदय प्रण पूणयहोवो, समाजसेवेचे हे व्रत असेच अखंड राहो, त्यांना उदंड आयुष्य लाभो, वर्धमान कर्तृत्व श्री भारत मातेचरणी अर्पण होवो हीच त्यांच्या जन्मदिनी श्री प्रभू चरणी प्रार्थना !

प्रविण शिवणगिकर ( रजिस्ट्रार राजा नारायणलाल लाहोटी इंग्लीशस्कुल लातूर )
मो 09923456728

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!