पॅरोल रजेवरील फरार आयोपीचा विवेकानंद पोलीसांनी घेतला तात्काळ शोध.
लातूर दि 29 जुलै औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातून दि 22 जानेवारी 2020 रोजी बाहेर आलेला आरोपी कारागृहात परत हजर न झाल्यामुळे आरोपीच्या निवास हद्दीतील पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे कारागृह पोलीस शिपाई नारायण भिमराव मुंडे यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. पोलीस खात्यातील वेगवान तपासासाठी नामांकित असलेले विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांनी आपल्या पोलीस समुहाच्या माध्यमातून तात्काळ शोध घेत पुणे येथे दबुन बसलेल्या आरोपी परमेश्वर शंकर जाधव वय 37 रा एल आय सी काॅलनी, लातूर याला ताब्यात घेतले आहे. लातूर येथे छञपती शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा घडला होता त्या अनुषंगाने तपास करुन न्यायालयात हजर केल्यावर त्यास न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेत तो औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.
याकामी पोलीस उप निरीक्षक श्री अनिल कांबळे, सहायक पोलीस उप निरीक्षक श्री विलास फुलारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री दिनेश हावा पाटील, पोलीस अंमलदार श्री अनिरुद्ध नलवाड यांनी परिश्रम घेतले आहे.