आई वडिलाविना शरयु आणि शांतनुची वैद्यकीय क्षेञात वाटचाल; मुंडे मामा अन् मामी बनले मायेचा आधार.
त्रिपुरा महाविद्यालयाने केला गुणवत्तेचा आणि मायेचा सत्कार.
लातूर प्रतिनिधी : आई-वडिलांच्या अकाली निधनाने निराधार झालेल्या शरयू आणि शांतनुला मुंडे मामा आणि मामीचा मायेचा आधार मिळाल्याने भाची शरयू आणि भाचा शांतनु यांनी वैद्यकीय क्षेत्रात मजल मारत आपल्या यशाकडे वाटचाल करत आहेत. मामा मामीच्या निस्वार्थ भावनेचा त्रिपुरा रिलायन्स कॉलेज येथे आज दिनांक 27 जुलै रोजी श्रीमती रोहिणी नऱ्हे विरोळे उपजिल्हाधिकारी लातूर यांच्या हस्ते शरयू शांतनू व त्यांचे मुंडे मामा मामी यांचा सत्कार करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

शरयू व शांतनु लहान असतानाच आई-वडिलांचे अकाली निधन झाले ही बाब विचारात घेऊन मामा मारुती मुंडे व मामी सुशीला मुंडे यांनी त्यांच्या बडवणी या मूळ गावी दोघांचाही स्वतःच्या मुलासारखा सांभाळ केला भाचा आणि भाची यांची अभ्यासात चुणूक दिसू लागल्याने त्यांना पुढील शिक्षणासाठी लातूर येथे नेऊन त्यांचे अकरावी बारावी नीट परीक्षेची तयारी करून घेतली त्यात दोघांनी घवघवीत यश प्राप्त केले. त्रिपुरा रिलायन्स महाविद्यालयात शिकलेल्या शांतनु वैजनाथ केंद्रे याने मुंबई येथील केम महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश मिळवला तर शरयु वैजनाथ केंद्रे हिने नीट 2025 या परीक्षेत महाराष्ट्रात दोन हजारावर प्राप्त करत राज्यातील उच्च श्रेणीतील महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे या कौतुकास्पद कार्याचे मुंडे मामा व मामी यांचे कौतुक केले जात आहे. याची दखल घेत आज दिनांक 27 जुलै रोजी त्रिपुरा रिलायन्स महाविद्यालयात लातूरचे उपजिल्हाधिकारी रोहिणी नरे यांच्या हस्ते मुंडे मामा व मामी यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी शरयू व शांतनु या दोघांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थाध्यक्ष उमाकांत होनराव, कोषाध्यक्ष प्रेरणा होनराव, कार्यकारी संचालक ओंकार होनराव, प्रा. संगम खराबे, प्रा. राकेश चौधरी, प्रा. सुनील वर्मा, प्रा. उदित उपाध्याय, प्रा. विकास सोनी, प्रा. गौतम कुमार, प्रा. रोहित यादव, प्रा. मयंक कुमार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.