चॅनलचा डिजिटल प्रवास: ५ वर्षे, करोडो दर्शक आणि सातत्यपूर्ण सत्य मांडणीचा वसा
लातूरच्या वृत्तक्षेत्रात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या ‘एल टी एन न्यूज’ (लातूर नेता डिजिटल न्यूज चॅनल) ने आपल्या यशस्वी प्रवासाची ५ वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त चॅनलचा ५ वा वर्धापन दिन विशेषांक नुकताच संपादक नेताजी जाधव यांच्या बालमित्रांच्या हस्ते अत्यंत उत्साहात प्रकाशित करण्यात आला. हा विशेष अंक आता वाचकांसाठी डिजिटल माध्यमावर पूर्णपणे खुला करण्यात आला आहे.
या विशेष अंकामध्ये विविध वैचारिक लेख, सुंदर कविता आणि आकर्षक चारोळ्यांचा समावेश करण्यात आला आहे. वाचकांनी या अंकाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले बालमित्र — विद्या मुगळे-पाटील, डॉ. अदिती खमितकर-तांदळे, अनुपमा चव्हाण, ॲड. प्रशांत जाधव, दिपाली शिंदे-करे, संदीप खमितकर, शिवनंदा माने, सारिका झिंगाडे आणि आशा खमितकर यांनी केले आहे.

स्थापनेपासूनचा दैदिप्यमान प्रवास आणि वाढता आलेख
लातूरमधील हॉटेल कन्हैया, बार्शी रोड येथे १ ऑगस्ट रोजी ‘लातूर नेता न्यूज चॅनल’चा ५ वा वर्धापनदिन व विशेषांक प्रकाशन सोहळा पार पडला. आज या चॅनलने यशस्वीपणे ५ वर्षे पूर्ण केली आहेत. या पाच वर्षांच्या कालखंडात डिजिटल माध्यमाच्या क्षेत्रात हे चॅनल सातत्याने सरस ठरले आहे. चॅनलचा प्रगतीचा आलेख सतत वरच्या दिशेने जात असून, लातूरकर वाचक व दर्शकांनी या उपक्रमाला नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे.

मागील पाच वर्षांत लातूर नेता न्यूज चॅनलच्या डिजिटल माध्यमातून करोडो दर्शकांनी बातम्या आणि लाईव्ह कव्हरेज पाहिले आहे. लातूरच्या पटलावर डिजिटल पत्रकारितेमध्ये एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून चॅनलने आपली हक्काची ओळख निर्माण केली आहे.
भविष्याचा संकल्प: “वास्तविक सत्य जशास तसे आणि पीडितांना न्याय”
आगामी काळाबद्दल बोलताना संपादक नेताजी जाधव यांनी स्पष्ट केले की,
“येणाऱ्या काळातही लातूर नेता न्यूज चॅनल सातत्याने वास्तविक सत्य जशास तसे जनतेसमोर मांडत राहील. समाजातील पीडित, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची पत्रकारिता सदैव कटिबद्ध असेल.”
आकर्षक हेडलाईन्स, निष्पक्ष आणि निर्भीड बातमीदारीच्या जोरावर लातूर नेता डिजिटल न्यूज चॅनलने वाचकांच्या मनात जे स्थान निर्माण केले आहे, त्याला वर्धापन दिनानिमित्त एक नवा आयाम मिळाला आहे. वाचक आणि हितचिंतकांनी या वर्धापन दिन विशेषांकाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे पुनश्च आवाहन संपादक नेताजी जाधव यांनी केले आहे.

