लातूरात राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलकडुन राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; सायकल रॅलीने वेधले लक्ष!लातूरात राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलकडुन राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; सायकल रॅलीने वेधले लक्ष!

विशेष वृत्त / लातूर नेता डिजिटल :

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन अत्यंत उत्साहात आणि दणक्यात पार पडला. जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी शिस्त, सांघिक भावना आणि क्रीडानिष्ठेचा प्रभावी संदेश दिला.

शहीद स्मारकाला आदरांजली व शानदार ‘गार्ड ऑफ ऑनर’

लातूरात राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलकडुन राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; सायकल रॅलीने वेधले लक्ष!

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा क्रीडा संकुलातील शहीद स्मारकाला क्रीडा उपसंचालक श्री. दीक्षित यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली. यानंतर, शाळेची स्पोर्ट्स कॅप्टन अदिती थोरमोठे हिच्या नेतृत्वाखालील गत वर्षातील ५४ गुणवंत खेळाडूंच्या पथकाने क्रीडा संचालनालयाचे उपसंचालक श्री. मिलिंद दीक्षित व जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयराज मुंढे यांना शानदार ‘गार्ड ऑफ ऑनर’ मानवंदना दिली. शाळेच्या आकर्षक मिलिटरी बँड पथकाने या सोहळ्यात विशेष रंग भरला. तसेच हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

‘सशक्त भारतासाठी मैदानावर रोज अर्धा तास द्या’ – क्रीडा उपसंचालक मिलिंद दीक्षित

लातूरात राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलकडुन राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; सायकल रॅलीने वेधले लक्ष!

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री. दीक्षित यांनी मेजर ध्यानचंद यांच्या महान कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. ऑलिम्पिक स्पर्धांमधील भारताचा गौरवशाली इतिहास सांगत त्यांनी खाशाबा जाधव आणि नीरज चोप्रा यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

“सशक्त भारतासाठी प्रत्येकाने मैदानावर रोज अर्धा तास दिला पाहिजे. सशक्त खेळाडू देशाला समृद्ध बनवितात. विकसित भारताच्या निर्मितीसाठी निरोगी आणि सक्षम युवा पिढीचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, दर्जेदार खेळाडू निर्माण करण्यात लाहोटी शाळा नेहमीच अग्रेसर राहील,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रसंगी शाळेचे प्राचार्य कर्नल श्रीनिवासुलु, रजिस्ट्रार प्रवीण शिवणगीकर व पर्यवेक्षक बी. के. भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘फिट इंडिया’ आणि ‘नशामुक्त भारत’चा संदेश देणारी सायकल रॅली

लातूरात राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलकडुन राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; सायकल रॅलीने वेधले लक्ष!
  • कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करत आरोग्य व तंदुरुस्तीचा संदेश दिला.
  • राष्ट्रीय क्रीडा दिनाचा उत्साह वाढवण्यासाठी शाळेच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी जिल्हा क्रीडा संकुल ते शाळेच्या क्रीडांगणापर्यंत एका आकर्षक सायकल रॅलीचे आयोजन केले.
  • ‘नशामुक्त भारत’ आणि ‘फिट इंडिया’ हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता. विद्यालयात पोहोचल्यावर या रॅलीचे अत्यंत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
  • राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंना आगामी प्रार्थना सभेत सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित होणमाळे यांनी केले, तर क्रीडा विभाग प्रमुख सुनील मुनाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या संपूर्ण उपक्रमामुळे लातूरच्या विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त, निरोगी जीवनशैली आणि राष्ट्रीय भावनेची नवी प्रेरणा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

(ताज्या आणि विश्वासार्ह लातूरच्या बातम्यांसाठी लातूर नेता डिजिटल वेब न्यूजला व्हिजिट करा!)

You cannot copy content of this page

error: Content is protected !!