लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या १४ व्या प्रेरणादिनानिमित्त रेणा साखर कारखाना स्थळी विनम्र अभिवादन!लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या १४ व्या प्रेरणादिनानिमित्त रेणा साखर कारखाना स्थळी विनम्र अभिवादन!

लातूर / रेणापूर : महाराष्ट्राचे लाडके नेते, माजी मुख्यमंत्री तथा आधुनिक लातूरचे शिल्पकार लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या १४ व्या प्रेरणादिनानिमित्त (स्मृतीदिनानिमित्त) रेणा सहकारी साखर कारखाना स्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व स्मृतीसंग्रहालयास पुष्पंजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी रेणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲड. प्रवीण पाटील यांनी स्व. विलासरावजी देशमुख साहेबांच्या लोकाभिमुख विकासात्मक कामांना आणि आठवणींना उजाला दिला.

लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या १४ व्या प्रेरणादिनानिमित्त रेणा साखर कारखाना स्थळी विनम्र अभिवादन!

प्रमुख उपस्थिती व कार्यक्रम:

कार्यक्रमाची सुरुवात कारखान्याकडील व परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादनाने झाली.

  • कारखान्याचे पदाधिकारी: चेअरमन श्री. अनंतराव ठाकुर-देशमुख, व्हाईस चेअरमन ॲड. प्रवीण पाटील, माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील व सर्जेराव मोरे, माजी आमदार तथा संचालक मा. श्री. त्र्यंबकराव भिसे.
  • संचालक मंडळ: चंद्रकांत सुर्यवंशी, तानाजी कांबळे, तुकाराम कोल्हे, शंकरराव पाटील, गोविंद पाटील, रणजित पाटील, बालाजी हाके, पंडीतराव माने, स्नेहलराव देशमुख, नरसिंग इंगळे (तक्रार निवारण समिती सदस्य), उमाकांत देशमुख आणि कार्यकारी संचालक श्री. बी. व्ही. मोरे.
  • इतर मान्यवर: कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. उमाकांत खलंग्रे, पंचायत समिती सदस्य बालाजी गोटके, उध्दव जाधव, तात्यासाहेब वाघमारे, रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश सुर्यवंशी, विश्वनाथ कागले, अजय माने, राजेभाऊ साळुंके आणि निवाडा गावचे सरपंच दिनेश साळुंके.

तसेच तालुक्यातील विविध सोसायट्यांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, सरपंच, उपसरपंच, विविध पदाधिकारी, पत्रकार, कार्यकर्ते, शेतकरी सभासद, तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गरजूंना अन्न वाटपाचा उपक्रम:

कारखान्याच्या वतीने अभिवादन सोहळ्यानंतर लातूर येथील स्व. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दुपारी उपचार घेत असलेले गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्न वाटपाचे सामाजिक उपक्रम राबवून प्रेरणादिन साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!