यांचा विकेट पडला चल पळ! म्हणत लातूरात एकास भोकसले.
अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याने सोडला श्वास; आमदार अमित देशमुख घटनास्थळावर दाखल.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात पाच दिवसांचा पीसीआर; इतर आरोपींचा शोध सुरु.
लातूर प्रतिनिधी : यांचा विकेट पडला चल पळ असे म्हणत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात धारदार चाकूने पोटात भोकसल्यामुळे अतिरिक्त रक्तस्त्राव होऊन उपचारा दरम्यान जखमीचा मृत्यू झाला असून आमदार अमित देशमुख घटनास्थळावर दाखल होत जखमीला रुग्णालयात भरती करण्यासाठी हलवण्यात आले होते.

अंगावर शहारे आणणारी केवळ अस्मितेसाठी आणि स्वतःचा बडेजावा निर्माण करण्यासाठी घडलेल्या घटनेने लातूर हादरून निघाले असून या घटनेने शहरात मोठी दहशत पसरली आहे तर तुझ्यापेक्षा मीच भारी हे दाखवण्यासाठी ही घटना घडली असल्याची चर्चा जिल्ह्यात पसरली आहे. काल दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही खुनाची घटना घडली असून याच दरम्यान आमदार अमित देशमुख आपल्या प्रचाराची सभा संपवून परतत असताना त्यांच्या निदर्शनास आली त्यांनी स्वतः जखमीला रुग्णालयात उपचारकामी हलवण्यासाठी प्रयत्न केले तर उपचारादरम्यान रात्री उशिरा विलासराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात जखमी प्रज्वल संजय मस्के वय २१ वर्ष राहणार बौद्ध नगर याच्या पोटात खोलवर धारदार शस्त्राच्या जखमा झाल्यामुळे अतिरिक्त रक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे येथील पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन फॉरेन्सिक लॅब च्या माध्यमातून घटनास्थळाची पाहणी व तपासणी केली या घटनेत जखमी होऊन मयत पावलेल्या युवकाच्या भावाच्या फिर्यादीवरून स्वामी विवेकानंद पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७/२०२६, प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १०९, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) बीएनएस गुन्हा नोंद करण्यात आला असून या गुन्ह्यातील पुढील तपासात कलम वाढ होणार असल्याचे पोलिसांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे तर दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले असल्याचे सांगितले आहे अशी माहिती पोलिसांनी आज दिनांक फेब्रुवारी रोजी सायंकाळी दिली आहे.

सदर गुन्ह्यात पोलीस अधीक्षक अमोल तांबे, पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवी व स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी ए पी खोडेवाड हे पुढील तपास करीत आहेत.

