पत्रकारितेतील प्रदीर्घ सेवेचा गौरव! पत्रकार लिंबराज पन्हाळकर यांना मानाचा ‘लातूर भूषण’ पुरस्कार प्रदान.पत्रकारितेतील प्रदीर्घ सेवेचा गौरव! पत्रकार लिंबराज पन्हाळकर यांना मानाचा ‘लातूर भूषण’ पुरस्कार प्रदान.

लातूर प्रतिनिधी :

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या दोन ते अडीच दशकांपासून निष्णात आणि निष्कलंक कार्य करणाऱ्या पत्रकार लिंबराज पन्हाळकर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (जिल्हा शाखा, लातूर) यांच्या वतीने यावर्षीचा मानाचा ‘लातूर भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. लातूरच्या दयानंद सभागृहात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र व शाल प्रदान करून गौरवण्यात आले.

कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती व पाहुणे :

  • उद्घाटक: शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री)
  • प्रमुख पाहुणे: बाबासाहेब पाटील (सहकारमंत्री) आणि विद्यानंद सागर महाराज
  • अध्यक्ष: संजय भोकरे (संस्थापक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ)
  • स्वागताध्यक्ष: आमदार अभिमन्यू पवार

कार्याचा बहुमान:

पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे साधन नसून ती सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडण्याचे माध्यम आहे, हे सत्य आपल्या लेखणीतून सिद्ध करत श्री. पन्हाळकर यांनी २० ते २५ वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रश्नांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या याच सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकीचा या पुरस्काराद्वारे यथोचित सन्मान करण्यात आला आहे.

पत्रकारितेतील प्रदीर्घ सेवेचा गौरव! पत्रकार लिंबराज पन्हाळकर यांना मानाचा ‘लातूर भूषण’ पुरस्कार प्रदान.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, अशा पुरस्कारांमुळे पत्रकारांची लोकहितार्थ कार्य करण्याची जबाबदारी अधिक वाढते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी केले, सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन अशोक हनवते यांनी केले. या सन्मानामुळे लातूरच्या पत्रकार वर्तुळातून श्री. पन्हाळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पत्रकार लिंबाराज पन्हाळकर यांना हा मिळालेला पुरस्कार म्हणजे खऱ्या अर्थाने पत्रकारितेचा सन्मान आहे. पत्रकार लिंबाराज पन्हाळकर यांना पुढील कार्यास भरभरून शुभेच्या – संपादक नेताजी जाधव, लातूर नेता डिजिटल न्युज; लातूर व्रतप्रवाह साप्ताहिक

You cannot copy content of this page

error: Content is protected !!