साईबाबा जनता सहकारी बँकेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; आर्थिक वर्षात बँक नफ्यात - चेअरमन जे. जी. सगरेसाईबाबा जनता सहकारी बँकेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; आर्थिक वर्षात बँक नफ्यात - चेअरमन जे. जी. सगरे

​लातूर प्रतिनिधी | २० सप्टेंबर २०२६

​साईबाबा जनता सहकारी बँकेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, रविवार दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता गांधी मार्केट, लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात उत्साहात पार पडली. बँकेचे चेअरमन श्री. जे. जी. सगरे यांच्या अध्यक्षखाली संपन्न झालेल्या या सभेत, गत आर्थिक वर्षात बँकेने भरीव कामगिरी करत नफा कमावल्याची घोषणा अध्यक्षांनी केली.

साईबाबा जनता सहकारी बँकेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; आर्थिक वर्षात बँक नफ्यात – चेअरमन जे. जी. सगरे

​सभेतील मुख्य ठळक मुद्दे व विषय:

  • ​नफ्याची घोषणा: गत आर्थिक वर्षात बँक यशस्वीरीत्या नफ्यात असल्याचे चेअरमन श्री. जे. जी. सगरे यांनी जाहीर केले.
  • ​वार्षिक अहवाल व ताळेबंद मंजूर: ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद पत्रक आणि नफा-तोटा पत्रकास सर्वसहमतीचे मंजुरी देण्यात आली.
  • ​अंदाजपत्रकास मान्यता: सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षातील खर्चास व आगामी सन २०२६-२०२७ या वर्षाच्या नवीन अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.
  • ​लेखापरीक्षण: सन २०२५-२०२६ च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेण्यात आली, तसेच रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीस अधीन राहून नवीन वैधानिक लेखापरीक्षकांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली.
  • ​महत्त्वाचे निर्णय: ग्राहकांसाठी ‘एकलकरमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत’ दिलेल्या सवलतींना आणि बँकेच्या प्रगतीसाठी चार चाकी वाहन खरेदी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात आली
साईबाबा जनता सहकारी बँकेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; आर्थिक वर्षात बँक नफ्यात – चेअरमन जे. जी. सगरे

​सभेच्या उत्तरार्धात अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आर. एम. पाटील यांनी संचालक मंडळाच्या आदेशानुसार सभेची नोटीस प्रसिद्ध केली होती. उपस्थित सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सभा अत्यंत यशस्वी वातावरणात पार पडली.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!