रांगोळीच्या रंगांतून योग संदेश! लातूरच्या मुख्य चौकात ५६०० चौ फुटांचे कलात्मक भूअलंकरण.रांगोळीच्या रंगांतून योग संदेश! लातूरच्या मुख्य चौकात ५६०० चौ फुटांचे कलात्मक भूअलंकरण.

लातूर | प्रतिनिधी: १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, लातूरच्या वतीने शहराचे मुख्य चौक रांगोळीच्या माध्यमातून उजळून निघाले. योग संदेशाचा प्रसार करण्यासाठी विद्यालयाने हाती घेतलेला हा उपक्रम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

​या उपक्रमाची माहिती देताना विद्यालयाचे प्रतिनिधी श्री प्रविण शिवणगिकर यांनी सांगितले की, पहाटे ४ वाजता सुरू झालेली ही मोहीम कला विभागातील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत जिद्दीने पूर्ण केली. “साधारण ५६०० चौरस फूट इतक्या विस्तीर्ण जागेत ६० किलो रंगांचा वापर करत अत्यंत रेखीव आणि अर्थपूर्ण रांगोळ्या” काढण्यात आल्या.

रांगोळीच्या रंगांतून योग संदेश! लातूरच्या मुख्य चौकात ५६०० चौ फुटांचे कलात्मक भूअलंकरण.

​या रांगोळ्यांमधून योगासने, आरोग्यदायी जीवनशैली आणि योग दिनाचा संदेश अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. भल्या पहाटेपासून सुरू असलेल्या या सृजनशील मोहिमेमुळे मुख्य चौकाचे स्वरूपच पालटले असून, योग दिनानिमित्त लातूरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!