शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी): तालुक्यातील शिवपुर येथे अवैध दारूविक्रीच्या विळख्यात अडकलेल्या गावातील परिस्थितीने आता हिंसक वळण घेतले आहे. गाव परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आणि धाब्यांविरोधात ग्रामस्थ, विशेषतः महिलांनी आक्रमक पवित्रा घेत, एका अवैध धाब्याची तोडफोड करून त्याला आग लावली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवपुर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून काही धाब्यांवर छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, कौटुंबिक शांतता भंग पावत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी अनेकदा केल्या होत्या. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. अखेर संयम सुटलेल्या ग्रामस्थांनी आणि महिलांनी एकत्र येत या अवैध धंद्यांविरोधात बंडाचे निशाण फडकवले.महिलांचे आक्रमक रूपया आंदोलनात महिलांची भूमिका अत्यंत आक्रमक होती.
“आमच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या दारूच्या अड्ड्यांचा नायनाट करा,” अशी मागणी करत महिलांनी थेट धाब्यावर मोर्चा काढला. ग्रामस्थांनी धाब्यात असलेली दारूची साठवणूक बाहेर काढून नष्ट केली आणि त्यानंतर रागाच्या भरात धाब्याला आग लावली. धाबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेनंतर शिवपुरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध धंद्यांच्या विरोधात तक्रार करूनही कारवाई का केली जात नाही, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारानंतर आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते आणि गावात होणारी अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थांचा इशारा: जोपर्यंत गावात अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असा पवित्रा शिवपुर ग्रामस्थांनी घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवपूर परिसरात छुप्या मार्गाने दारूची अवैध विक्री सुरू होती. या दारूमुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली असून, अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. याविरोधात ग्रामस्थांनी वारंवार स्थानिक प्रशासनाकडे धाव घेतली, तक्रारी केल्या. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला.
महिलांचा मोर्चा आणि ‘बंडा’चे निशाण
या अन्यायाविरोधात आज महिलांनी पुढाकार घेत थेट धाब्यावर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेत, “आमच्या लेकरांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या अड्ड्यांचा आता नायनाटच करायचा,” असा निश्चय केला. आंदोलकांनी धाब्यातील दारूचा साठा बाहेर काढून नष्ट केला आणि त्यानंतर संतप्त जमावाने धाब्यालाच आग लावून दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक बाब म्हणजे, अवैध धंद्यांच्या विरोधात तक्रार करूनही प्रशासन ‘मूग गिळून’ गप्प का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असले तरी, ग्रामस्थांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. आता पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग या घटनेची दखल घेऊन काय कारवाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.