लातूर: शैलेशजी लाहोटी यांच्या वाढदिवसानिमित्त तायक्वांदो खेळाडूंचा गौरव; ‘अञिवरद प्रतिष्ठान’चा स्तुत्य उपक्रमलातूर: शैलेशजी लाहोटी यांच्या वाढदिवसानिमित्त तायक्वांदो खेळाडूंचा गौरव; ‘अञिवरद प्रतिष्ठान’चा स्तुत्य उपक्रम

लातूर| प्रतिनिधी :

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शैलेशजी लाहोटी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अञिवरद प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेने एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबविला. तायक्वांदो या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या लातूरच्या गुणवंत खेळाडूंचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करून प्रतिष्ठानने खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

​या कार्यक्रमास ‘रिलिजन टू रिस्पॉन्सिबिलिटी’चे अध्यक्ष राहुल पाटील चाकूरकर आणि कॅप्टन बी. के. भालेराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी अञिवरद प्रतिष्ठानचे संस्थापक प्रवीण शिवणगिकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

खेळाडूंना प्रेरणा देणारा उपक्रम.

​यावेळी आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंच मास्टर नेताजी जाधव म्हणाले की, “अञिवरद प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे खेळाडूंना सन्मानित करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवत आहे. अशा प्रकारच्या सत्कारामुळे खेळाडूंचे मनोबल वाढून त्यांना भविष्यात मोठी प्रेरणा मिळते.” तसेच, लातूरकरांना लाहोटी परिवाराचे मोठे सामाजिक योगदान लाभले असून शैलेशजी लाहोटी हे स्वतः सतत सामाजिक कार्यात सक्रिय असतात, असेही त्यांनी नमूद केले.

​सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा – राहुल पाटील

​सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा – राहुल पाटील

​कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राहुल पाटील चाकूरकर यांनी खेळाडूंना प्रोत्साहित करताना सांगितले की, “आयुष्यात यशस्वी व्हा, उत्तम खेळाडू बना किंवा व्यावसायिक बना, परंतु कधीही आपल्या सामाजिक जबाबदारीचा विसर पडू देऊ नका.”

यशस्वी आयोजनासाठी परिश्रम

​या सोहळ्याच्या व्यासपीठावर संतोष बेंबळकर व महेश वळसंगे उपस्थित होते. आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनील मुनाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय तायक्वांदो पंच रागिणी क्षिरसागर , विवेक डोंगरे, आशिद बनसोडे, अमृत पावले, अनिल कांबळे, ज्ञानेश्वर यादव, मंगेश रंकाळे, ज्ञानेश्वर गोसावी आणि तुषार येवनगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!