वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज: जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाडवाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज: जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

​राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या ‘जिज्ञासा’ ग्रंथालयाचे शानदार उद्घाटन; १७ व्या वर्धापन दिनानिमित्त शाळेचा दुग्धशर्करा योग

लातूर | प्रतिनिधी

​डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व आजही अबाधित आहे. वाचन संस्कृती ही समाजाची मोठी संपत्ती असून ती जोपासणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले लातूर येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त प्राथमिक विभागासाठी उभारण्यात आलेल्या ‘जिज्ञासा’ या सुसज्ज व आधुनिक ग्रंथालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी होते, तर महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे महासचिव अनिलकुमार नावंदर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज: जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

​वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न

​यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले की, “पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एवढे सुसज्ज ग्रंथालय उभारणे ही कौतुकास्पद बाब आहे. किंडल आणि डिजिटल माध्यमांच्या युगात वाचनाची गोडी लावणे महत्त्वाचे आहे. विशेषतः या ग्रंथालयात मराठी भाषेतील पुस्तकांचा मोठा संग्रह उपलब्ध आहे, जे शासनाच्या मातृभाषा धोरणाला बळ देणारे आहे.”

वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज: जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

​संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक

​शाळेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्था पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी शाळेच्या शैक्षणिक व उपक्रमशील कार्याचे विशेष कौतुक केले.

​मान्यवरांची उपस्थिती

वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज: जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्राचार्य कर्नल श्रीनिवासुलु यांनी केले, तर सूत्रसंचालन राणी आमले यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र मालपाणी, ॲड. आशिष बाजपेयी, चेअरमन आनंद लाहोटी, कोषाध्यक्ष ईश्वरप्रसाद डागा, विश्वस्त हुकुमचंद कलंत्री, डॉ. अनिल राठी, सूर्यप्रकाश धूत, लक्ष्मीकांत करवा, बालकिशन बांगड, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे यांसह अनेक मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!