लातूरचे प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांची आत्म**; राहत्या घरी संपवले जीवनलातूरचे प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांची आत्म**; राहत्या घरी संपवले जीवन

लातूर : शहरातील प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे लातूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

  • घटना: पद्मा नगर येथील राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या.
  • वेळ: मंगळवारी सकाळी प्रकार उघडकीस आला.
  • कारवाई: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे.
  • कारण: त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून, अधिकृत तपासानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होईल. सोनवणे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीय व मित्रपरिवारावर शोककसळा पसरली आहे.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!