श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शैलेश लाहोटी, सचिवपदी आशिष बाजपाई यांची फेरनिवड; ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न!श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शैलेश लाहोटी, सचिवपदी आशिष बाजपाई यांची फेरनिवड; ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न!

स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्ञानदानाचे अखंड कार्य करत असलेल्या लातूरच्या प्रतिष्ठित श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत आगामी पाच वर्षांसाठी नवीन कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणीची निवड:

  • अध्यक्ष: शैलेश लाहोटी
  • सचिव: आशिष बाजपाई
  • उपाध्यक्ष: राजेंद्रकुमार मालपाणी
  • सह उपाध्यक्ष: दिनेश इन्नानी
  • सहसचिव: शरदकुमार नावंदर
  • उप सहसचिव: सुहास शेट्टी
  • कोषाध्यक्ष: हुकूमचंद कलंत्री
  • विश्वस्त मंडळ अध्यक्ष: लक्ष्मीरमण लाहोटी

सभेच्या सुरुवातीस दिवंगत सदस्य, शिक्षण तज्ञ आणि लोकप्रतिनिधींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सभेच्या सुरुवातीस दिवंगत सदस्य, शिक्षण तज्ञ, लोकप्रतिनिधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सचिव आशिष बाजपाई यांनी प्रास्ताविक केले, तर अध्यक्षीय मनोगतातून शैलेश लाहोटी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला. सभेचे प्रास्ताविक सचिव आशिष बाजपाई यांनी केले तर अध्यक्षीय मनोगतातून शैलेश लाहोटी यांनी संस्थेच्या कर्तुत्वाचा आलेख सदर केला. यावेळी संस्थेव्दारे चालवले जाणारे विद्यालय आणि एस एम मार स्विमिंग पूलच्या कार्याचा अहवाल चित्रफितीतून दाखवण्यात आला. यावेळी संस्थेद्वार संचालित सर्व विद्यालय व एस एम मार स्विमिंग पूल आदीच्या अलोकिक कार्याचा अहवाल चित्रफितीतून सादर करण्यात आला.

मुख्य निवडणूक अधिकारी विधिज्ञ श्रीकांत उटगे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अमोल निम्बुरगे यांनी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कायदेशीर व बिनविरोध पार पाडली. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी विधिज्ञ श्रीकांत उटगे व सहाय्यक निवडणूक अधिकारी अमोल निम्बुरगे यांनी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडली. सभेचे आभार प्रदर्शन सहसचिव शरदकुमार नावंदर यांनी केले. सभेचे आभार प्रदर्शन सहसचिव शरदकुमार नावंदर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

#LaturNews #MarwadiRajasthanSanstha #ShaileshLahoti #AshishBajpai #LaturEducation #GaneshNagarLatur #LaturNetaDigitalNews

You cannot copy content of this page

error: Content is protected !!