लातूर पोलिसांची ‘खास’ मर्जी अन् आरोपींचा धिंगाणा; औसा रुग्णालयात खाकीचा ताठ कणा विरघळला, तर कत्ती हातात घेऊन फिरणाऱ्यांनी उडवली सुरक्षा वाऱ्यावर!
औसा ग्रामीण रुग्णालयात मध्यरात्री दारूच्या नशेत आरोपीची पोलिसांशी झटापट; मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला थरार
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याऐवजी त्यांच्यासोबत ‘फोटोशूट’ करण्याची खाकीची किमया चर्चेचा विषय
लातूर (विशेष वृत्त):
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी धावणाऱ्या लातूर पोलिसांची कार्यपद्धती सध्या नेमकी चाललीय कुठे, असा संतप्त सवाल समोर येत आहे. एकीकडे खाकी वर्दीचा डर आरोपींच्या मनात उरलेला नाही हे औसा ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या थरारावरून स्पष्ट होते, तर दुसरीकडे हातामध्ये तब्बल दोन फुटांची धारधार ‘कत्ती’ घेऊन दहशत माजवणाऱ्या गुन्हेगाराला ताब्यात घेतल्यानंतर, त्याच्यासोबत चक्क प्रेसनोटसाठी ‘फोटोशूट’ करण्याची ‘कृपा’ पोलिसांकडून दाखवण्यात आली. पोलिसांच्या या अजब कारभारावरून नेमका कोणता संदेश दिला जात आहे, असा उपहासात्मक सवाल लातूरकरांच्या तोंडी चर्चेत आहे.
घटना १: औसा रुग्णालयात मध्यरात्रीचा तमाशा
दिनांक ८ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्री, औसा येथील ग्रामीण रुग्णालयात एका व्यक्तीला वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. दारूच्या नशेत चूर असलेल्या या व्यक्तीने थेट पोलिसांसोबतच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने रुग्णालय परिसरात पोलीस आणि त्या आरोपीमध्ये धक्काबुक्की व झटापट झाली. रुग्णालयासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी, जिथे नागरिक जीव वाचवण्यासाठी येतात, तिथेच पोलिसांना आरोपीसोबत झटापट करावी लागणे हा पोलिसांच्या धाकावरील मोठा प्रश्नचिन्ह ठरला आहे. मध्यरात्री उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून, हा व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
लातूर पोलिसांची ‘खास’ मर्जी अन् आरोपींचा धिंगाणा; औसा रुग्णालयात खाकीचा ताठ कणा विरघळला, तर कत्ती हातात घेऊन फिरणाऱ्यांनी उडवली सुरक्षा वाऱ्यावर!
घटना २: कत्तीबाज आरोपीसोबत ‘फोटोशूट’चा प्रताप
दुसऱ्या एका घटनेत, स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातामध्ये दोन फूट लांब धारधार कत्ती घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले होते. अशा खतरनाक गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर बडगा उगारणे अपेक्षित असताना, त्यांच्यासोबत प्रेसनोटसाठी ‘छायाचित्र सत्र’ रंगवण्यात आले. गुन्हेगारांच्या हातात हत्यार आणि पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये कौतुकाची थाप, या चित्रामुळे सामान्य जनतेचा जीव टांगणीला लागला आहे.
लातूर पोलिसांची ‘खास’ मर्जी अन् आरोपींचा धिंगाणा; औसा रुग्णालयात खाकीचा ताठ कणा विरघळला, तर कत्ती हातात घेऊन फिरणाऱ्यांनी उडवली सुरक्षा वाऱ्यावर!
वैद्यकीय अधिकारी व जनता दहशतीच्या छायेत
पोलिसांचा हा अतिउदार आणि नरमाईचा दृष्टिकोन समाजासाठी अत्यंत घातक ठरत आहे. शासकीय रुग्णालयात सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि रात्री-बेरात्री उपचारासाठी येणारे सामान्य नागरिक आता असुरक्षिततेच्या वातावरणात जगत आहेत. जर पोलीसच अशा नशेखोरांसोबत आणि हत्यारबंद गुन्हेगारांसोबत असा कारभार चालवणार असतील, तर लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था खरोखर अस्तित्वात आहे का, असा खडा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
लातूर पोलिसांची ‘खास’ मर्जी अन् आरोपींचा धिंगाणा; औसा रुग्णालयात खाकीचा ताठ कणा विरघळला, तर कत्ती हातात घेऊन फिरणाऱ्यांनी उडवली सुरक्षा वाऱ्यावर!
संपादक- नेताजी जाधव लातूर नेता डिजिटल न्युज | लातूर वृत्त प्रवाह साप्ताहिक