एलटीएन न्यूज च्या सर्व दर्शक व वाचकांना सुचित करण्यात येते की दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी एल टी एन न्यूज चा चौथा वर्धापन दिन साजरा होत आहे.
दिनांक 01 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झालेले लातूर नेता न्यूज चॅनेल अर्थात एल टी एन न्यूज चॅनेल खूप कमी दिवसात सर्वात जलद गतीने बातमीचे वृत्तांत आपल्यापर्यंत पोहंचवण्यासाठी यशस्वी ठरले असून डिजिटल मीडियातील सर्व प्लॅटफॉर्मवर एल टी एन न्यूज चॅनेल ट्रेडिंग वर आहे. महाराष्ट्रासह मराठवाड्यातील आणि लातूर जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा हे चॅनेल घेत आहे आणि या बातम्यांना आपण सर्वजण खूप प्रेम देऊन डोक्यावर घेतलं आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप मनस्वी आभार…
आपण वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिन विशेषांक तयार करत आहोत या विशेष अंकात आपले लेख चारोळ्या कविता विविध प्रकारचे चित्र व्यंगचित्र छायाचित्रित केलेले निसर्ग चित्र वात्रटिका याचबरोबर लेखी शुभेच्छा संदेश पाठवावेत योग्यतेप्रमाणे छापले जाईल.
या वर्धापन दिन विशेषांकात व्यवसाय,आस्थापना, शाळा, महाविद्यालय, संस्था, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व वैयक्तिक जाहिरात ही प्रकाशित केली जाणार असून यासाठी आपणहून पुढाकार घ्यावा व एल टी एन न्यूजला बळकट करण्यासाठी हातभार लावावा ही विनंती.
दरपत्रक सोबत जोडत आहोत…
धन्यवाद
_*मुख्य संपादक श्री नेताजी जाधव*_
