घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीना 01 लाख 80 हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक तर इतर 09 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
लातूर दि 28 जुन शहरातील वेगवेगळ्या दुकानांचे रात्रीच्या वेळी पत्रे कापून, कडीकोंडा तोडत आतमध्ये प्रवेश करून रोख रक्कम, मोबाईल फोन, चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केला असून त्याने शहरात विविध ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे तर इतरही नऊ प्रकारचे गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात उघडकीस आणण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून एमआयडीसी पोलीस ठाणे व शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे नोंद असलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यात येत असताना सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना सदरच्या पथकाला दुकानांचे रात्रीच्या वेळी पत्रे कापून, कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून रोख रक्कम, मोबाईल फोन, चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून दिनांक 27 जून रोजी पथकाने रेणापूर नाका परिसरातून एकाला ताब्यात घेतले व त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांने त्यांचे नाव दिनेश महादेव टेकाळे उर्फ शंकर दत्तात्रय पांचाळ, वय 29 वर्ष राहणार हरिभाऊ नगर कृपासदन रोड, लातूर असे असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून त्याने लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी करून चोरलेले मोबाईल फोन तसेच रोख रक्कम चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले हॅन्डग्लोज, पक्कड, कटर, लोखंडी टामी असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या आणखीन एक पथकाने उदगीर येथे कारवाई करत गुन्ह्यात चोरलेले दोन मोबाईल हस्तगत केले आहे. एकंदरीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्कृष्ट कारवाई करत घरफोडी व चोरीचे 09 गुन्हे उघडकीस आणून 1लाख 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. नमूद आरोपीस त्यांनी चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता संबंधित पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे पोलीस अमलदार युवराज गिरी, राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, गणेश साठे, साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, नितीन कठारे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड यांनी केली आहे.