लातूर प्रतिनिधी : काँग्रेसचे युवा नेते, संत गोरोबा सोसायटीचे अध्यक्ष विकास कांबळे यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त घेण्यात आलेल्या शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केले.

कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त वयोवृद्ध महिलांना साडी-चोळीचे वितरण करण्यात आले. येथील शासकीय रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांना फळांसह अन्नदान करण्यात आले. अंधशाळेतील विद्यार्थ्यांनाही अन्नदान करण्यात आले. शहरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १६ मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. गंजगोलाईतील माता जगदंबा मंदिरात अभिषेक व पातळ अर्पण करण्यात आले. यावेळी आई जगदंबा देवीची महाआरती करण्यात आली. यानिमित्त शहराच्या संत गोरोबा सोसायटीसह शहराच्या पूर्व भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
