लातुरात भाजपचे आंदोलन म्हणजे चमकोगिरीसाठी स्टंटबाजी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांचा भाजपवर हल्लाबोल.लातुरात भाजपचे आंदोलन म्हणजे चमकोगिरीसाठी स्टंटबाजी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांचा भाजपवर हल्लाबोल.

लातुरात भाजपचे आंदोलन म्हणजे चमकोगिरीसाठी स्टंटबाजी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांचा भाजपवर हल्लाबोल.

लातूर : रविवारी सायंकाळी लातूर शहरातील प्रभाग 18 मध्ये आ. अमित देशमुख यांच्या हस्ते रस्ता विकास कामाचे भूमिपूजन होत असताना शहर जिल्हा भाजपने कार्यक्रमात घुसून गोंधळ घालण्याचा जो प्रकार केला. तो लातूरच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नव्हता. भाजपच्या नावावर स्टंटबाजी करून स्वतःची चमकोगिरी करून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ऍड. किरण जाधव यांनी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्यावर नाव न घेता आजच्या पत्रकार परिषदेत केला.

लातुरात भाजपचे आंदोलन म्हणजे चमकोगिरीसाठी स्टंटबाजी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांचा भाजपवर हल्लाबोल.

भाजपने काल काँग्रेसच्या कार्यक्रमात केलेल्या राड्यानंतर आपली भूमिका स्पष्ठ करण्यासाठी आज 14 जुलै रोजी दुपारी दोन वाजता काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ऍड. किरण जाधव हे बोलत होते ते म्हणाले, आजपर्यंत विरोधाला विरोध झाला असेल पण मात्र कार्यक्रमात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न हा लातूरमध्ये पहिल्यांदाच झाला आहे. तो अत्यंत निंददनीय आहे. वर्क ऑर्डर असलेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचा स्थानिक आमदारांना अधिकार आहे. स्वतःच्या गल्लीत विकास कामांचे उदघाट्न होत आहे. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी होऊ लागली. केवळ आपले अपयश लपवण्यासाठी आणि भाजपचे नाव वापरून स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी नैरास्येतून हे कृत्य केलेले आहे.

लातुरात भाजपचे आंदोलन म्हणजे चमकोगिरीसाठी स्टंटबाजी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांचा भाजपवर हल्लाबोल.

यापुढे काँग्रेस गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. असा इशारा ॲड. किरण जाधव यांनी यावेळी दिला तर माजी सभापती अशोक गोविंदपूरकर म्हणाले, लातूरच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. याचे उत्तर आमच्यापेक्षा मनपा निवडणुकीत जनताच देईल. स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी देशमुखांना विरोध करण्यासाठी भाजपची ही स्टंटगिरी होती तसेच माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले, लातूरच्या कार्यक्रमात वरवंटीच्या भाजप कार्यकर्त्यांचे काय काम होते तो गैर प्रकार करण्यासाठीच आला होता. आम्हा त्याला मारहाण केली नाही तर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

लातुरात भाजपचे आंदोलन म्हणजे चमकोगिरीसाठी स्टंटबाजी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांचा भाजपवर हल्लाबोल.

तर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय साळुंके यांनीही भाजपच्या राजकारणावर टीका केली. तें म्हणाले, विकास कामांचे भूमिपूजन करण्याचा आमदारांना घटनात्मक अधिकार आहे. निधी भाजप किंवा काँग्रेसचा नसतो तर तो सरकारचा असतो. भाजपने काँग्रेसच्या कार्यक्रमात केलेला राडा हा पोरकट पणा आहे. लातूरच्या संस्कृतीची प्रतारना आहे. आगामी मनपा निवडणुकीत तें हरणार आहेत. हे त्यांना कळलेय म्हणून तें असे प्रकार करीत आहेत. तसेच मनपाचे माजी महापौर दिपक सूळ यांनी म्हटले की, विकास कामांचे फसवं उदघाट्न होतं असा विरोध आरोप करत आहेत. हे साफ चुकीचे आहे. कामांची वर्क ऑर्डर होती. माजी नगराध्यक्ष लक्षमण कांबळे यांनी म्हटले आहे की, सत्ताधारी भाजपवाले गुजरातच्या कंपनीला पोसण्यासाठीच असे प्रकार घडवले जात आहेत. या पत्रकार परिषदेला माजी उपमहापौर कैलास कांबळे व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!