लातूरच्या कृषी महाविद्यालयातील एकलव्य वस्तीगृहात बीएससी प्रथम वर्षातील विद्यार्थ्याची आत्महत्या.
नीट परीक्षेत स्वतःचे मार्क्स छेडछाड करून इतरांना सांगितल्याचा मानसिक दबाव सहन न झाल्यामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना आज दिनांक 19 जून रोजी सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान घडली असून स्वामी विवेकानंद पोलिसांच्या हद्दीतील ही घटना आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासणी व पंचनामा पूर्ण करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

सदर विद्यार्थ्याचे नाव दीपक कुमार वय 21 वर्ष राहणार खत कल्याण, जिल्हा सवाई मधोपूर, राजस्थान येथील असून त्याच्या नातेवाईकांना निरोप देण्यात आला आहे दीपक कुमार हा कृषी महाविद्यालयात बीएससी ऍग्री प्रथम वर्षात शिकत होता.
