पन्नास रुपयाच्या वादातून बाभळगाव रोडवरील म्हाडा कॉलनीत एकाचा खून तर तिघेजण गंभीर जखमी.
स्वामी विवेकानंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना; जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल.
लातूर दिनांक 17 जून शहरातील बाभळगाव रोडवर असलेल्या म्हाडा कॉलनी येथे पन्नास रुपयाच्या वादावरून दोन आरोपीकडून एकाचा खून करण्यात आला असून तिघांना गंभीर जखमी करण्यात आले आहे. सदर घटनेने लातूर हादरून निघाले आहे. जखमींना विलासराव देशमुख वैद्यकीय रुग्णालय येथे उपचारासाठी एकास अतिदक्षता विभागात तर अन्य दोघांना सामान्य विभागात उपचार सुरू आहेत सदर घटना काल दिनांक 16 जून रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या दरम्यान बाबळगाव रोडवरील म्हाडा कॉलनीत घडली असून या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याच्या अगोदर स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील व स्थानिक गुन्हे शाखा लातूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी नियंत्रणात आणली आहे तर परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

त्याचे झाले असे आरोपी कडे बालाजी देविदास गायकवाड याच्या पान टपरीवर आरोपी 16 जून रोजी दुपारी 3 वाजता गेला असता आरोपीकडे असलेले पन्नास रुपये परत मागितल्यावर त्याने शिवीगाळ व मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी दिनांक 16 जून रोजी रात्री सव्वा दहा वाजता गणेश उत्तम सूर्यवंशी, देविदास किसन गायकवाड, करण राजू काळुंके, राजू दास काळुंके व इतर अन्य काही जण गेले असता आरोपी व त्याच्या सख्या भावाने मिळून धारदार शस्त्राने गणेश उत्तम सूर्यवंशी वय अंदाजे 38 वर्ष राहणार बाभळगाव रोड म्हाडा कॉलनी याच्या छातीत मारल्याने गणेश याचा मृत्यू झाला आहे तर या झटापटीत देविदास किसन गायकवाड अंदाजे वय 50 वर्ष याच्या पोटावर मार लागल्याने तो गंभीर जखमी आहे याचबरोबर करण राजू काळुंके वय अंदाजे वीस वर्ष व राजू दास काळुंके वय अंदाजे 45 वर्ष यांना जबर मारहाण झाली आहे.

मयत गणेश उत्तम सूर्यवंशी राहणार बाभळगाव रोड म्हाडा कॉलनी याचे शव उत्तरीय तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील अंगुली मुद्रा विभागाच्या माध्यमातून घटनेचा पंचनामा व चलचित्रीकरण करण्याचे काम सुरू आहे. सदरील घटनेत स्वामी विवेकानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कांबळे हे करीत आहे.
