रिलायन्स लातूर पॅटर्नची सीईटी PCM व PCB परीक्षेत उत्तुंग भरारी!
श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा महाराष्ट्रभर कीर्तिमान यश.
लातूर दि 17 जून श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय आणि रिलायन्स लातूर पॅटर्नने MHT-CET २०२५ च्या इंजिनीअरिंग व मेडिकल परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाने पुन्हा एकदा लातूर पॅटर्नचा डंका राज्यभर वाजवला आहे. या परीक्षेत मेडिकल ग्रुपसाठी सुमारे २.८२ लाख तसेच इंजिनीअरिंग ग्रुपसाठी ४.२० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, त्रिपुरा व रिलायन्सच्या विद्यार्थ्यांनी वरच्या टक्केवारीसह घवघवीत यश संपादन केले आहे. प्रमुख यशस्वी विद्यार्थी भोसले सुजित याने ९९.९१ परसेंटाईल मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक, सिद्धी तोडकरी हिने ९९.७१ परसेंटाईल मिळवत महाविद्यालयात द्वितीय क्रमांक तर ओम ढाकणे व राधिका खरसाडे या विद्यार्थ्यांनी ९९.६१ परसेंटाईल मिळवत महाविद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला आहे. याव्यतिरिक्त, संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे.

९९% पेक्षा अधिक परसेंटाईल ८ विद्यार्थी ९८% पेक्षा अधिक परसेंटाईल १४ विद्यार्थी ९७% पेक्षा अधिक परसेंटाईल १६ विद्यार्थी ९६% पेक्षा अधिक परसेंटाईल १९ विद्यार्थी ९५% पेक्षा अधिक परसेंटाईल: २२ विद्यार्थी हे यश केवळ विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीचेच नाही, तर संस्थेच्या नियोजनबद्ध मार्गदर्शन प्रणालीचे आणि अनुभवी शिक्षकांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे. यापूर्वी १२वी बोर्ड परीक्षेतही संस्थेने उत्कृष्ट निकाल सादर केला होता.
या यशानंतर संस्थेचे अध्यक्ष मा. उमाकांत होनराव सर, सचिव तथा प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम, कार्यकारी संचालक प्रा. ओंकार होनराव, तसेच प्रा. सतीश पाटील, प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. मीरा मुंडे, प्रा. दिवे मेघा, प्रा. एम. आय. शेख, प्रा. दीपमाला तेलंग, प्रा. संगम खराबे, प्रा. आश्विनी मोरे, प्रा. आरती घोडके, प्रा. नेमीचंद बनसोडे, प्रा. स्नेहा पाटील, प्रा. शुभांगी गंगथडे, प्रा. दीपक होनराव, प्रा. ज्ञानेश्वर पुरी आणि परीक्षा विभाग प्रमुख शेख ए. आर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
