NEET 2025 परिक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्न चा विक्रमी निकाल.
लातूर प्रतिनिधी : श्री संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तथा रिलायन्स लातूर पॅटर्न या संस्थेने NEET 2025 परीक्षेत विक्रमी यश संपादन करत लातूरचा शैक्षणिक झेंडा पुन्हा उंचावला आहे. या परीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्नच्या 311 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असुन व्यास तांबडे याने 720 पैकी 573 गुण मिळवून प्रथम, संदेश शिंदे याने 572 गुण गुण मिळवून द्वितीय तर उझमा फातेमा काझी हिने 561 गुणाने तृतीय क्रमांक प्राप्त करत संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे. 550 हुन अधिक गुण मिळवणारे एकूण 05 तर 500 हुन अधिक गुण मिळवणारे 12 विद्यार्थी या महाविद्यालयाचे आहेत.

गुणवत्ता, सातत्य, सुरक्षितता आणि अभ्यासाभिमुख वातावरण यांचा मेळ साधत Reliance Latur Pattern ने यशस्वी विद्यार्थ्यांची नवी फळी घडवली असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष मा. उमाकांत होनराव यांनी लातूर नेता न्यूजशी बोलताना व्यक्त केले आहे तर या यशामागे वेळेचा योग्य वापर, शिस्तबद्ध प्रशिक्षण, आणि तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत असेही ते बोलताना सांगत होते.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष मा. उमाकांत होनराव, सचिव व प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम, कार्यकारी संचालक ओंकार होनराव, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
