जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी स्विकारला लातूरचा पदभार; विविध क्रीडा संघटनेकडून करण्यात आले स्वागत.
लातूर दि 9 जून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या क्रीडा व युवक सेवा संचनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर येथे पुणे येथील जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांची बदली झाली असून त्यांनी दिनांक 6 जून रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पदाचा पदभार स्विकारला आहे. तर त्यांचे लातूर जिल्ह्यात विविध खेळाच्या संघटनेच्या वतीने आज दिनांक 9 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान स्वागत करण्यात आले आहे.

महादेव कसगावडे यांनी पुणे येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा पदभार उत्कृष्ट रीतीने पार पडला आहे. त्यापूर्वी ते लातूर येथे काही काळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते तर त्यांनी अनेक राज्य राष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन करून शासनाच्या क्रीडा योजना प्रभावी अमलात आणत अनेक खेळाडूंना प्रोत्साहित केले आहे. पुढील काळातही त्यांनी शासनाच्या विविध क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यात खेळाचा विकास करतील अशी अपेक्षा क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूरचे सचिव नेताजी जाधव, ट्रॅडिशनल रेसलिंग जिल्हा संघटनेचे सचिव के वाय पटवेकर, पत्रकार लिंबराज पन्हाळकर क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, सुरेंद्र कराड, चंद्रकांत लोदगेकर, कैलास लटके, जयराज मुंडे, सारिका काळे, बावणे, दत्तात्रय गडपल्लेवार, यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.