लातूरमध्ये 'ऑक्सिजन मॅन' प्यारे जिया खान यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; कामगारांना उन्हापासून बचावासाठी साहित्याचे वाटप
लातूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष आणि ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून सर्वपरिचित असलेले प्यारे जिया खान यांचा वाढदिवस लातूरमध्ये सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा करण्यात आला. प्यारे खान फाउंडेशनच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवारी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वाढदिवसाचे औचित्य साधून, सध्याच्या कडक उन्हाचा तडाखा लक्षात घेता, कष्टकरी कामगारांना दिलासा देण्यासाठी टोपी, टी-शर्ट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी लातूर महानगरपालिकेचे परिवहन सभापती फैसलखान कायमखानी, नगरसेवक अफजल कुरेशी, ॲड. ला.रा. शेख, इंजि. मुख्तार शेख, भाजपचे सलीम शेख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार बशीर शेख ‘कलमवाला’ यांनी केले, तर आभार पत्रकार हमिद शेख यांनी मानले.
लातूरमध्ये ‘ऑक्सिजन मॅन’ प्यारे जिया खान यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; कामगारांना उन्हापासून बचावासाठी साहित्याचे वाटप
उपस्थित मान्यवरांनी प्यारे खान यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “प्यारे खान यांनी अत्यंत संघर्षातून सामान्य माणसापासून असामान्य पदापर्यंत मजल मारली आहे. वाढदिवसाचा खर्च डामडौलात न करता कामगार आणि गरजू घटकांना मदत करणे, ही त्यांची कार्यपद्धती भारतीयता आणि बंधुतेचे दर्शन घडवते.”
सेवाभावी कार्याचा वारसा
कार्यक्रमाचे आयोजक सालार शेख यांनी प्रास्ताविकात सांगितले की, प्यारे खान यांच्या सेवाभावी कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हाच यामागचा उद्देश आहे.
लातूरमध्ये ‘ऑक्सिजन मॅन’ प्यारे जिया खान यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; कामगारांना उन्हापासून बचावासाठी साहित्याचे वाटप
या उपक्रमामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. भर उन्हात मिळालेल्या या मदतीबद्दल कामगारांनी समाधान व्यक्त करत प्यारे जिया खान यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी प्यारे खान फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.