प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे लातूर जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठी चालनाप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे लातूर जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठी चालना

लातूर:

कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजने’मुळे (PMFME) लातूर जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठा वेग मिळाला आहे. सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीत जिल्ह्यातील ४५५ अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

या सर्व प्रकल्पांसाठी २८ कोटी ९७ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले असून लाभार्थ्यांना १० कोटी १७ लाख ५९ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

योजनेचे प्रमुख निकष व आर्थिक सहाय्य

  • वैयक्तिक लाभार्थी: एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध.
  • स्वयं-सहायता गट (SHG): ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत सहाय्य. लहान उपकरणे खरेदीसाठी प्रति सदस्य ४० हजार रुपये (कमाल ४ लाख रुपये).
  • सामायिक पायाभूत सुविधा: कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी ३५ टक्के अनुदान.
  • समाविष्ट उद्योग: डाळी, तेलघाणी, मसाले, पापड, शेवया, चिक्की, दुग्धजन्य पदार्थ, गूळ उद्योग यांसारख्या स्थानिक कच्च्या मालावर आधारित सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन.

अर्ज कसा करावा?

  • वैयक्तिक लाभार्थी: पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा.
  • गट लाभार्थी: जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत ‘एक जिल्हा-एक उत्पादन’ (ODOP) अंतर्गत ऑफलाइन अर्ज सादर करावेत.
  • अधिकृत संकेतस्थळ: www.mofpi.nic.in

संपर्क माहिती

योजनेचा अधिक लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, लातूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • मार्गदर्शन अधिकारी: दिलीप प्रभूराव जाधव (जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर)
  • संपर्क क्रमांक: ७०२०३८७४३५

You cannot copy content of this page

error: Content is protected !!