अण्णाभाऊ साठे महामंडळाला २००० कोटींचा निधी द्या; लातूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
लातूर (प्रतिनिधी) : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला २००० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी लातूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
महामंडळाच्या कर्ज वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गरजू लाभार्थ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी या मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
- लॉटरी पद्धत बंद करा: महामंडळाची सध्याची लॉटरी पद्धत बंद करून, अर्जदारांच्या ज्येष्ठतेनुसार (Seniority) निवड करून प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत.
- NSFDC अंतर्गत १० लाखांचे कर्ज: राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळाच्या (NSFDC) धर्तीवर १० लाखांपर्यंतची कर्ज प्रकरणे मंजूर करावीत.
- सहकारी बँकेमार्फत कर्ज वितरण: महामंडळाच्या कर्जाचे वितरण सहकारी बँकेमार्फत करावे, जेणेकरून प्रक्रियेत गती येईल.
- ५०% अनुदान मिळावे: महामंडळाच्या योजनांतर्गत मिळणारे अनुदान ५० टक्के करण्यात यावे.

यावेळी ज्येष्ठ नेते गोरोबाजी लोखडे, मंगेश वैरागे, सचिंद्र कांबले, आश्विन कांबले, श्रीधर आवले, योगेश पवार, रोहित लोढे, बालाजी गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

