लातुरात मटका जुगारावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा छापा; २२ हजारांचा मुद्देमाल जप्त.लातुरात मटका जुगारावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा छापा; २२ हजारांचा मुद्देमाल जप्त.

लातुरात मटका जुगारावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा छापा; २२ हजारांचा मुद्देमाल जप्त.

​लातूर (प्रतिनिधी) : अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या विशेष पथकाने लातूर शहरातील हत्ते कॉर्नर परिसरात छापा टाकून अवैध मटका जुगारावर कारवाई केली आहे.

​२६ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने शिवराज राम मामडगे (वय ३०, रा. कासारगाव) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून मटका जुगाराचे साहित्य, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण २२,५६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. ही कारवाई विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख व कर्मचाऱ्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!