धक्कादायक: केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात मृत्यू; महसूल विभाग शोकसागरात
लातूर/केज: केज तालुक्याचे तरुण आणि धडाडीचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे लातूर बीड मार्गावर आज सकाळी रेनापुर फाटा ते नेहरूनगर तांडा दरम्यानच्या वळणावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे महसूल विभागात मोठी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण बीड आणि लातूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तहसीलदार राकेश गिड्डे हे आज सकाळी आपल्या खासगी कारने (MH10DQ9895) ने प्रवास करत होते. केस गुण लातूरच्या दिशेने जात असताना रेणापूर फाटा ते नेहरूनगर तांडा दरम्यान असलेल्या वळणावर त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले. गाडीचा वेग अधिक असल्याने कार महामार्गावरून खाली जवळपास दहा ते पंधरा फुट सखल भागात भीषणरीत्या पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला व गाडीचे अवशेष पाचशे मिटर पर्यंत पसरले यामधे राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार दि ९ एप्रिल रोजी सकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.
पोलीस आणि प्रशासनाची धाव
पोलीस आणि प्रशासनाची धाव अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि रेणापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत गिड्डे यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अपघाताचे कारण
रेणापूर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, महामार्गावर गाडी वेगात असताना गाडिवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा. कारमध्ये ते एकटेच प्रवास करत होते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, अपघाताचे नेमके तांत्रिक कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
एक कर्तव्यदक्ष अधिकारी हरपला
एक कर्तव्यदक्ष अधिकारी हरपला राकेश गिड्डे यांची ओळख एक अत्यंत कार्यक्षम, शांत संयमी आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून होती. केज तहसीलदार म्हणून काम करताना त्यांनी अनेक प्रशासकीय कामे मार्गी लावली होती. एका तरुण आणि हुशार अधिकाऱ्याचा असा अकाली मृत्यू झाल्याने महसूल प्रशासनावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रेणापूर ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. गिड्डे यांच्या पश्चात त्यांचे कुटुंब आणि मोठा मित्रपरिवार असून, त्यांच्या जाण्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.